गडचिरोली : दुधाळ गाय वाटप घोटाळ्यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता हे दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर गडचिरोलीतील आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गुप्ता यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. १९ ऑगस्ट रोजी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यालय परिसरात शुभम गुप्ता यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भामरागड येथे २०२१ ते २०२३ या कार्यकाळात झालेल्या दुधाळ गाय वाटप घोटाळ्यात प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता हे दोषी असल्याचे आदिवासी विभागाच्या अपर आयुक्तांनी केलेल्या चौकशीत आढळून आले. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून या ‘आयएएस’ अधिकाऱ्याच्या कारनाम्यांची प्रशासकीय वर्तुळात खमंग चर्चा आहे. दरम्यान, गडचिरोलीतील आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि पोलीस बॉईज असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, मागास आणि आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन शेकडो कोटी रुपये खर्च करीत असते. मात्र, काही असंवेदनशील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या या प्रयत्नांना हरताळ फासल्या जात आहे. प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी गाय वाटप योजनेमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला. या प्रकरणाची अपर आयुक्तांनी चौकशी केल्यानंतर गुप्ता दोषी असल्याचे अहवालात नमूद केले आहे. सोबतच या अहवालात लाभार्थी आणि त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. गडचिरोलीत कार्यरत राहून कोट्यवधीचा भ्रष्टाचार करणे, आदिवासी समाजातील लाभार्थी आणि कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावणे हा सर्व प्रकार गंभीर आहे. सध्या सांगली येथे महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेले शुभम गुप्ता यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. सोबतच त्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

हेही वाचा – World photography day : पालखीत कॅमेरे सजवून वाजत- गाजत काढली दिंडी…

हेही वाचा – VIDEO : पाणी वाहात असलेल्या पुलावरून दुचाकी नेणे पडले महागात

सात दिवसांत मागण्यांचा विचार न झाल्यास आदिवासी संघटनांनी मिळून देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष कोरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली, उमेश उईके, अक्षय मडावी, आरती कोल्हे, विद्या दुगा, मालती पुडो, बादल मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.