गडचिरोली : ३०० कोटींच्या संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या सासऱ्याची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या गडचिरोली येथील नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना मनीष पुट्टेवार (पार्लेवार) हिने नागरिकांच्या हरकती बाजूला ठेऊन भूमाफियांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा विकास आराखडा प्रारुप बनविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भूमाफियांसाठी शेकडो कोटींच्या भूखंडावर कब्जा करण्याचा मार्ग मोकळा झाला. पुट्टेवार हिला अटक झाल्यानंतर तीचे अनेक कारनामे समोर येत असून हे बघून जिल्ह्यातील अधिकारीही चक्रावले आहेत.

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील नगरपंचायत क्षेत्राचा विकास आराखडा बनविण्यात आला. त्याचा नकाशा व प्रारूप बनविण्याचे काम नगररचना विभागाकडे असते. संबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या सूचना व हरकती एकूण घेण्यासाठी जाणसुनावणी घेतली जाते. यात कुणाचेही एकूण न घेता भूमाफियांच्या सूचनेवरून त्यांना अनुकूल असे प्रारूप बनविण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. हत्या प्रकरणानंतर अटकेत असलेल्या पुट्टेवार हिचे कारनामे एकूण अधिकारीही हैराण झाले आहेत. या विकास आराखड्यात अनेक पूररेषेतील जमिनी ‘यलो बेल्ट’ करून त्याठिकाणी ‘लेआऊट’ बनविण्यात आले. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसलेल्या भूखंडांना अकृषक करण्यात आले. काही भुविकासकांना त्यांच्या जमिनीपेक्षाही अधिकची जमीन देण्याचे प्रताप करण्यात आले. यामागे हत्याप्रकरणात संशय असलेला देसाईगंज येथील ‘तो’ भूमाफिया, गडचिरोलीतील काही ‘बिल्डर’ कंपन्या, अहेरी येथील भूमाफिया यांची प्रमुख भूमिका आहे. मागील तीन वर्षात या माध्यमातून हजारो कोटींची उलाढाल झाली आहे. सद्या अकृषकसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रलंबित असेलेल्या बहुतांश प्रकरणात नगररचना विभागाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात संशयास्पद शेऱ्यावर काही अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असल्याचे कळते. त्यामुळे लवकरच या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

हेही वाचा – ‘एमएसएमई’ संचालक प्रशांत पार्लेवारला अटक, बहिण अर्चना पुट्टेवारसोबत मिळून हत्याकांडाचा कट

आदिवासींच्या जमिनीची विक्री?

गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश वनजमीन तसेच आदिवासींच्या मालकीच्या जमिनी आहेत. त्यामुळे नियमानुसार या जमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही. तसे करायचे झाल्यास मंत्रालय स्तरावरून मंजुरी गरजेची असते. परंतु अर्चना पुट्टेवार हिच्या कार्यकाळात याही जमिनीची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष करून अहेरी शहरात व उपविभागात काही ‘लेआऊट’ आदिवासी नागरिकांच्या मालकीच्या जमिनीवर टाकण्यात आले व त्यातील भूखंडांची विक्री देखील करण्यात आली. भूमीअभिलेख कार्यालयात कार्यरत एक कर्मचारी, एक शिक्षक आणि एक राजकीय व्यक्ती यात सहभागी असल्याचे कळते. भूमीअभिलेखच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याची तर अनेक लेआऊटमध्ये भागीदारी असून आलापल्ली मार्गावरील नाल्याशेजारी पूररेषेत येणाऱ्या जागेवर त्याने भूखंड विक्रीला काढले आहे. हे सर्व माफिया पुट्टेवार हिच्या खास मर्जीतील होते, हे विशेष.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत फटका बसताच एसटी कर्मचाऱ्यांच्या कोविड भत्त्याची आठवण! संघटना म्हणतात…

भ्रमणध्वनीतून उलगडणार कारनामे!

अतिशय थंड डोक्याने कट रचून अर्चना पुट्टेवार हिने आपल्या सासऱ्याची सुपारी देत हत्या केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तीन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर अर्चना पुट्टेवार हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, पोलीस तपासात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पुट्टेवार हिच्या भ्रमणध्वनी ‘सीडीआर’मधून गडचिरोलीतील कारनामेही उलगडू शकतात. त्यामुळे येथील भूमाफियांचे धाबे दाणाणले आहेत.