गडचिरोली : कार्यालयीन वेळेत ‘ओली पार्टी’ करणाऱ्या बेडगाव वनपरिक्षेत्रात कार्यरत क्षेत्रसहायक आणि वनरक्षकाला देसाईगंज उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी निलंबित केल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निलंबित क्षेत्रसहायक अजय गहाणे आणि वनरक्षक बबलू वाघाडे या दोघांनीही काही दिवसांपूर्वी बेडगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या मोहगाव रोपवाटिकेत ‘ओल्या पार्टी’चे आयोजन केले होते. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतानाही त्याठिकाणी मद्य आणले गेले. दोघेही कार्यालयीन वेळेत मद्यधुंद अवस्थेत कार्यरत होते. दरम्यान रोपवाटिकेत आलेल्या नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधितांचे चित्रीकरण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली होती.

हेही वाचा – वैदर्भियांनो सावधान! आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

हेही वाचा – यवतमाळ : आदिवासी आश्रमशाळांतील ३५ विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये प्रवेश, ‘एकलव्य’सह आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा पथदर्शी उपक्रम

याप्रकरणी चौकशी केल्यानंतर उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दोषी अधिकाऱ्यांना १२ जुलै रोजी निलंबित केले. या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli forest officer liquor party in office nursery ssp 89 ssb
Show comments