Gadchiroli Naxalite woman: एका सरपंचासह दोन निरपराध व्यक्तींचा खून, सात चकमकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप असलेली जहाल महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी उर्फ सोनी उर्फ सरिता उर्फ कविता (४०,रा.तुर्रेमरका ता. भामरागड) हिने २१ ऑगस्टला पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

वयाच्या १६ व्या वर्षी नक्षल चळवळीत सामील होऊन तिने शस्त्र उचलले होते. तिच्यावर महाराष्ट्र शासनाचे सहा लाख रुपयांचे बक्षीस होते. २००७ मध्ये छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील नैबरेड दलममध्ये सदस्य म्हणून संगीता पोदाडी ही भरती झाली होती. २००८ मध्ये कोहकामेटा दलम माड डिव्हिजनमध्ये तिची बदली झाली. पुढे तिने महासमुंद दलममध्ये काम केले. २०१४ मध्ये तिला सहायक कमांडर म्हणून बढती मिळाली. कार्यकाळात तिचा छत्तीसगडमधील पाच व ओडिशातील दोन अशा एकूण सात चकमकीत सहभाग होता. छत्तीसगडच्या सोनपूर येथील रस्ता कामावरील ट्रॅक्टर व जेसीबी जाळल्याचा गुन्हाही तिने केला होता. ओडिशात २०१२ मध्ये भरतोंडा जि. बरगड गावातील सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०१५ मध्ये तिने जामशेठ व २०१७ मध्ये सालेपल्ली या गावांतील दोन निरपराध व्यक्तींचा खून केला.

Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
digital watch Maharashtra jail
कारागृहातील अर्थकारणावर आता “डिजिटल वॉच”; कैद्यांसह भेटायला येणाऱ्यांचे…
chinchwad music program of bela shende
भक्तिगीते, युगुलगीते, लावणी, चित्रपटगीतांनी रंगली सुरांची मैफिल
Shatrughan Sinha slams Mukesh Khanna
“हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”
panvel three woman stolen Rs 1 85 lakh and jewels from gold jewellery shop
अवघ्या सहा मिनिटांत सोनाराला महिलांचा गंडा
Purva Kaushaik
“काय बोलावं, काय करावं कळत नाहीये”, सासूच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट
Priyanka Gandhi Reaction on Narendra Modi Speech
Priyanka Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “खूप दशकांनंतर मला असं जाणवलं की…”

हेही वाचा – Raj Thackeray : “प्रशासनाचा धाक नसल्याने बदलापूर, कोलकातासारख्या घटना”, राज ठाकरेंचे वक्तव्य; म्हणाले, “न्यायालयात प्रकरण…”

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून संगीता पुसू पोदाडी हिला एकूण साडेचार लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. तब्बल दोन तप नक्षल चळवळीला देणाऱ्या संगीताने शस्त्र खाली ठेऊन पोलिसांपुढे शरणागती पत्कारली. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा , पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली.

आतापर्यंत २४ जणांचे आत्मसमर्पण

नक्षलवादविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ पासून आतापर्यंत २४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

हेही वाचा – विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण : ‘चाईल्ड हेल्पलाईन’कडे तीन दिवसांपूर्वीच तक्रार, तरीही…

कापेवंचा खून प्रकरणी अटक

कापेवंचा येथील निरपराध इसमाच्या खुनात पाहिजे असलेल्या एका कट्टर हस्तकास गडचिरोली पोलीस व राज्य राखीव दलाच्या पथकाने २१ रोजी अटक केली. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. प्रमोद मधुकर कोडापे ( ३७ , रा. भंगारामपेठा, ता. अहेरी) असे त्याचे नाव आहे. कापेवंचा (ता. अहेरी) येथे २४ नोव्हेंबर २०२३ रोजी रामजी आत्राम या निरपराध व्यक्तीच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. २०१७ पासून तो नक्षल चळवळीशी जोडला होता. माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, इतर साहित्य पुरविणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करणे असा त्याच्यावर आरोप आहे. २०२२ पासून आतापर्यंत ८९ माओवाद्यांना अटक करण्यात पोलीस दलास यश आलेले आहे.

Story img Loader