गडचिरोली: नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या जवानांनी कुख्यात नक्षलवादी ‘बिटलू’चे स्मारक तोडून नक्षल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. विविध कारणांनी मृत्यूमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी २८ जुलै ते ३आगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांकडून सर्वत्र शहीद सप्ताह पाळला जातो. या कालावधीत हिंसक कारवाया घडवून आणण्यासोबत, मृत नक्षलवाद्यांच्या स्मृतित शहीद स्मारके बांधणे, यासोबत पत्रकबाजीतून नागरिकांना सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्षलवाद्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता सर्वकाही सुरळीत राहावे यासाठी पोलीस यंत्रणेचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टिने पोलीस सर्वत्र करडी नजर ठेवून आहेत. दरम्यान, नागरिकांमधील नक्षल्यांची दहशत कमी करण्यासाठी पोलीस पथकाने गुरुवारी जहाल नक्षली बिटलू तिरसू मडावी याचे भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथे नक्षलवाद्यांनी बनविलेले स्मारक तोडले. विशेष अभियान पथक व क्युआरटी पथकाने ही कारवाई केली. काही महिन्यांपूर्वी चकमकीत पोलिसांनी ‘बिटलू’ला ठार केले होते. त्याची दक्षिण गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात दहशत होती.

हेही वाचा… अतिवृष्टीमुळे पीक विमा काढण्यात तांत्रिक अडचणी; २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढीसाठी…

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर माओवादी कॉम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याने एक पुस्तिका प्रकाशित करून नक्षल चळवळीतील काही नेत्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आहे. त्यात नक्षल चळवळीसाठी देशात आतापर्यंत ४ हजार ५७७ जणांनी प्राण गमावले असून त्यात ८५६ महिला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli police soldiers have responded to naxalites by demolishing the monument of notorious naxalist bitlu ssp 89 dvr
Show comments