गडचिरोली : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याचे सत्र कायम असून शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील कळमटोला जंगल परिसरात आज पुन्हा एकाचा वाघाने बळी घेतला. कृष्णाजी ढोणे (६५) असे मृताचे नाव असून तो गुरे चारण्याकरिता जंगलात गेला होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
देसाईगंज तालुक्यात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात त्या परिसरात ३ नागरिकांचा वाघाने बळी घेतला. कालसुध्दा उसेगाव परिक्षेत्रात वरंब्या गोळा करणाऱ्याचा वाघाने बळी घेतला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुपारी २ वाजताच्या सुमारास कळमटोला जंगल परिसरात गुरे चारायला गेलेल्या कृष्णाजी ढोणे यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून वाघांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
First published on: 09-09-2022 at 17:59 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli tiger kills one more incident in kalamatola forest area ysh