गडचिरोली : जिल्ह्यात नक्षल चळवळ सोडून आत्मसमर्पण करण्याचे सत्र सुरुच असून ११ जुलै रोजी आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजुबाई (३६,रा. बोगाटोला (गजामेंढी) ता. धानोरा) व अखिल संकेर पुडो उर्फ रत्नमाला उर्फ आरती (३४,रा.मरकेगाव ता. धानोरा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे १६ लाखांचे बक्षीस होते.

प्रमिला व अखिला या दोघीही नक्षल चळवळीत सध्या प्लाटून पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टीम व स्टाफ टीम सदस्य म्हणून काम करायच्या. त्यांच्या अटकेने नक्षल्यांना आणखी एक धक्का बसला आहे.  प्रमिला ही २००५ मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाली व २०११ पर्यंत काम केले. पुढे ती २०११ ते १४ मध्ये वैरागड दलममध्ये सक्रिय होती. नंतर २०१४ ते १५ दरम्यान केकेडी दलममध्ये तिने काम केले. २०१५ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये सदस्य पदावर तिची बदली झाली. २०१८ मध्ये तिला प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाली.

Five Naxalites killed in encounter with security forces
छत्तीसगडमध्ये दोन महिलांसह पाच नक्षलवादी ठार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
Gadchiroli, Surrender women Naxalites, Naxalites,
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…
bibwewadi police arrest nursing woman for stealing jewellery
शुश्रुषा करणाऱ्या महिलेकडून दागिन्यांची चोरी; महिला अटकेत; साडेआठ लाखांचे दागिने जप्त
Sunayana won gold medal in womens bodybuilding competition
खेडेगावातून थेट जागतिक भरारी, महिला काँस्टेबलची वृत्ती करारी
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना

हेही वाचा >>>आदिवासींच्या जमिनीवर रिसोर्ट, सरकारचे चौकशीचे आदेश

२०२२ मध्ये डीके सप्लाय टीम व स्टाफ टीममध्ये बढती होऊ प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून ती कार्यरत होती.  अखिला ही २०१० मध्ये नक्षल चळवळीशी जोडली गेली. टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाल्यावर २०१३ पर्यंत कार्यरत होती. २०१३ नंतर तिची प्लाटून क्र. १५ मध्ये सदस्य पदावर बदली झाली. नंतर ती प्लाटून क्र. ४ मध्ये सदस्य पदावर बदलीने कार्यरत झाली. २०१५ मध्ये  डीके सप्लाय टीम व स्टाफ टीममध्ये तिने सदस्य म्हणून काम केले. २०१८ मध्ये तिला  डीके सप्लाय टीम व स्टाफ टीममध्ये प्लाटून पार्टी कमिटी सदस्य पदावर पढती मिळाली.

प्रमिलावर ४०, अखिलावर ७  गुन्ह्यांची नोंद

प्रमिला हिच्यावर ४० गुन्ह्यांची नोंद आहे. यात २० चकमकी, २ जाळपोळ व इतर १८ गुन्ह्यांचा समावेश आहे. अखिलावर ७ गुन्हे नोंद असून यात ४ खून, २ चकमक व इतर १ गुन्ह्याचा समावेश आहे.   महाराष्ट्र सरकारने दोघींवर प्रत्येकी ८ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

दोघींना मिळणार प्रत्येकी पाच लाख

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून प्रमिला व अखिला या दोघींना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळणार आहेत. २०२२ पासून आतापर्यंत एकूण २१ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम पार पडली.

Story img Loader