नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा समारंभ अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यक्रमाला उपस्थित राज्यपाल, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमुळे वातावरणात एक प्रकारचे दडपण होते. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या काही ओळींनी केली आणि वातावरणातील ताण दूर झाला. उपस्थितांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. गडकरी यांनी सादर केलेले ते प्रसिद्ध भजन पुढील प्रमाणे –

मनी नाही भाव, म्हणे देवा ! मला पाव।
देवा अशानं भेटायचा नाही रे !
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ! ।।
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चांदीचा देव त्याला चोराचं भेव ।
लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।
देव बाजारचा भाजीपाला  नाही रे ।।