नागपूर : निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांचे महत्त्व कळू लागले आहे. त्याला जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपाही त्याला अपवाद नाही. भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना नेत्यांना कार्यकर्त्यांचे महत्त्व समजावून सांगितले.
भाजपाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त सुधाकर कोहळे यांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. त्यात गडकरी बोलत होते. पक्षाच्या पडत्या काळात कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टामुळेच आज भाजपाला चांगले दिवस आले हे विसरून चालणार नाही. त्यामुळे तो दुरावणार नाही याची काळजी घ्या,असे गडकरी म्हणाले. हे सांगताना त्यांनी सायकलचे उदाहरण दिले.
हेही वाचा – रेल्वे विलंबास तांत्रिक बिघाडाचे कारण ६० टक्के
गडकरी म्हणाले “सायकल कितीही चांगली असेल, नवीन असेल, पण तिचा व्हॉल्व फुटला असेल तर ती चालत नाही. तिचा काहीही उपयोग होत नाही. सायकल चांगली चालावी असे वाटत असेल तर ‘व्हॉल्व’ही चांगलाच असावा लागतो. कार्यकर्ता हा पक्षाच्या सायकलचा ‘व्हॉल्व’ असतो. त्याला टिकवा ”