बुलढाणा : विदर्भाची पंढरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये ‘श्रीं’चा प्रगट दिन उत्सव यंदा २० फेब्रुवारीला पारंपरिक उत्साहात व लाखावर भाविकांच्या साक्षीने साजरा करण्यात येणार आहे.

गुरुवारी, १३ फेब्रुवारी महारूद्र स्वाहाकार यज्ञ पुजन करुन या श्रींच्या प्रगटदिन उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रगट दिन उत्सवानिमित्त संत गजानन महाराज संस्थान मंदिरात आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यादरम्यान सकाळी ५ ते ६ काकडा ,७.१५  ते ९ .१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० वाजेदरम्यान किर्तन पार पडणार आहे. १३ फेब्रुवारी अनंत बुवा कनवाडे.कळमुळा, १४ फेब्रुवारी वासुदेव बुवा कोलंबीकर. नायगांव बा, १५ फेब्रुवारी प्रशांत बुवा ताकोते.सिरसोली, १६ फेब्रुवारी अनंत बुवा बिडवे. बाशी, १७ फेब्रुवारी राम बुवा डोंगरे, जाटनांदूर  १८ फेब्रुवारी मयुर बुवा बोडखे श्री क्षैत्र देहू, १९ फेब्रुवारीला श्रीहरी बुवा वैणव जालना, तर २० फेब्रुवारी श्रीराम बुवा ठाकूर लातूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. २० फेब्रुवारी २०२५ रोजी श्री संत गजानन महाराज प्रगटदिन असल्याने या दिवशी सकाळी १० ते १२ श्री भरत बुवा पाटील म्हैसवाडी याचे शेगावी श्रीच्या प्रगट्या निमित्य किर्तन होईल.

आज १३ फेब्रुवारी रोजी श्री महारूद्र स्वाहाकार यज्ञाचे पुजन बीड जिल्ह्यातील वेदमूर्ती ब्राह्मणवृंदाद्वारे करण्यात आले. आज श्रीच्या मंदिरात व सर्व परिसरात केळीच्या खांबाचे खुट व आंबाच्या पानाची तोरणे लावली आहे. श्री संस्थान मघ्ये प्रगटदिन निमित्ताने श्रींच्या समाधी मंदिरावर आणि परिसरात पिवळ्या रंगाची विद्युत रोषणाई तर प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

२० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री  महारूद्र स्वाहाकार यज्ञाची पुर्णाहूती होऊन अवभृतस्नान होईल. दुपारी ४ वाजता उत्सवांची पालखी अश्व, रथ, मेणासह परिक्रमा करीता निघेल. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ ते ८ काल्याचे किर्तन श्रीराम बुवा ठाकरे लातूर यांच्या मधुर वाणीतून होऊन प्रगटदिन उत्सवाची सांगता होणार आहे. श्री प्रगटदिन उत्सावात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, मध्येप्रदेश, या ठिकाणाहून भजनी दिंड्या दाखल होत आहे. गजानन अवलीया अवतरले जग तराया, ज्ञानेबुवा तुकाराम नामघोष करित शेगांव शहरात भजनी दिंड्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.

Story img Loader