बुलढाणा: ‘आम्हासाठी शेगावच तीर्थक्षेत्र अन पर्यटनस्थळ’ ही बुलढाण्यासह राज्यातील लाखो गजानन महाराजांच्या निस्सीम भक्तांची धारणा. यामुळे अगदी ‘थर्टीफर्स्ट’लादेखील लाखो भक्त संतनगरीत दाखल होतात. त्यांच्या सुविधेसाठी यंदाही ‘श्रीं’चे मंदिर ३१ डिसेंबरला २४ तास खुले राहणार आहे.
गजानन महाराजांच्या साक्षीने मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे संकल्प करण्यासाठी दरवर्षी ३१ डिसेंबरला लाखावर भाविक विदर्भ पंढरी शेगावात दाखल होतात. भाविकांची वाढती गर्दी पाहता, त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी गजानन महाराज संस्थानने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराजांचे मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
हेही वाचा – पावसाने होणार नववर्षाचे स्वागत! वाचा, कुठे कुठे पडतील सरी…
हेही वाचा – ‘डॉक्टरेट’वरून टीका, फडणवीस म्हणतात, ‘ टीका करणारे…’
या परिणामी समाधीस्थळाच्या दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगा, भाविकांना दर्शनासाठी कैक तास करावी लागणारी प्रतीक्षा हे चित्र यंदा नसणार आहे. रात्री दर्शन घेणारे भाविक रात्रीच किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या गावांकडे रवाना होतात. यापरिणामी अप्रत्यक्षपणे संस्थान व प्रामुख्याने सेवेकऱ्यांवरील ताण काहीसा कमी होणार आहे.