लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोला: जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत आतापर्यंत ५८७ एकर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ टाकण्यात आला. गाळयुक्त हे क्षेत्र सुपीक झाले. धरणातून काढण्यात आलेल्या गाळामुळे १८ कोटी ८० लाख लिटरने जलसाठवण क्षमतेत वाढ झाली आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेचा जिल्ह्याला दुहेरी लाभ होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेत आपापल्या शेतात गाळ वाहून न्यावा व आपली शेती अधिक सुपीक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसाठी जमिनीची सुपीकता वाढवणारी योजना आहे. त्यासाठी अशासकीय संस्थांतर्फे कार्यान्वित यंत्रणांमार्फत १६ ठिकाणी गाळ काढण्याचे काम करण्यात आले. त्यात जिल्हातील ५२२ शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या शेतात धरणातील गाळ पसरवून घेतला.
हेही वाचा… खबरदार! सार्वजनिक ठिकाणी लघुशंका कराल तर…
तब्बल ५८७ एकर क्षेत्रावर एक लाख ८८ हजार ४२ घनमीटर गाळ पसरवण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात जलसाठवण क्षमतेत १८ कोटी ८० लाख लिटरने वाढ झाली आहे. हे अभियान राबवण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी, जलसंधारण विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे जि.प. अकोला, जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग आदी यंत्रणा सहभागी आहेत. जिल्ह्यात एकूण १६ ठिकाणी गाळ काढण्याचे काम केले जात आहे.
पाऊस लांबल्याने मुदतवाढ
योजनेला मिळालेला प्रतिसाद व लांबलेला पावसाळा पाहता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी पहिला मोठा पाऊस येईपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. याआधी ही मुदत १५ जून पर्यंत होती ती आता वाढवण्यात आली.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पाऊस लांबल्याने त्याला आता मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत ५८७ एकर क्षेत्रावर धरणातील गाळ टाकण्यात आला. जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ झाली. – हरी गीते, जिल्हा जलसंधारण अधिकारी.