टाईम पास म्हणून खेडोपाडी झाडाखाली बसून तीन पत्तीचा जुगार खेळणे सार्वत्रिक चित्र म्हणावे. पण अशा जुगारामुळे युवा पिढी आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे तर त्यांचे कुटुंब पुढील पिढीबाबत चिंतित आहे.हे ओळखून पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी ग्रामीण भागातील ठाणेदार व पोलीस चौकी असलेल्या गावात जुगारबंदीबाबत खबरदार केले. अवघ्या दोनच दिवसात धडाधड छापे पडले.

हेही वाचा >>>अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा ‘‘हिरवा चिखल’’; पपई, कांदा, टरबूज, खरबूजसह उन्हाळी पिके भुईसपाट

खरांगणा रवी वानखेडे, तळेगाव अशोक सोमनाथ, आष्टी सूरज खरे, दुर्गवाडा शैलेश पाटील, पुलगाव सतीश डंभारे, सिंदी मोरेश्वर धाले, देवळी विशाल डोने तर सावंगी येथे राजकुमार बावरीसह सहा जणांवर गुन्हे दाखल झाले. सट्टापट्टीचे आकडे असलेला कागद व पत्त्यांचे जोड तसेच रोख जप्त करण्यात आली. यामुळे टाईम पास नसती उठाठेव ठरल्याची भावना या युवकांमध्ये पसरली आहे. जुगारात सापडलेली रक्कम अगदी किरकोळ ठरावी. एकाही ठिकाणी हजार रुपयावर पैसे मिळाले नाही. मात्र व्यसन पसरत चालल्याचे स्पष्ट झाले.

Story img Loader