गोंदिया : मंगळवारी सर्वत्र जल्लोष आणि आनंदात गणरायाची स्थापना झाली. गणरायांचा आवडता मोदक हा पूर्वी घरातील महिला घरीच तयार करायच्या. मात्र यातही काळानुरूप बदल झाले आहेत. आता बहुतांश घरी बाजारातील मिष्ठान्नाच्या दुकानात मिळणाऱ्या मोदकलाच पहिली पसंती दिली जाते. यंदा बाप्पाच्या अतिप्रिय मोदकालाही महागाईची झळ बसली आहे. मोदक आणि पेढ्यांच्या दरामध्ये प्रतिकिलो ५ ते १० टक्के वाढ झाली आहे. दूध, खवा आणि साखरच्या दरात वाढ झाल्याने प्रसादाच्या दरातही वाढ झाली आहे.
सध्या दुधाचा प्रतिलिटर दर ६९ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत तर खवा प्रतिकिलो ३५० ते ४०० रुपयांवर आहे. त्यामुळे मोदक, पेढ्यांच्या दरात वाढ झाल्याचे गोंदियातील एका मोठ्या मिठाई विक्रेते श्यामसुंदर मिठाईवाला यांनी सांगितले.
हेही वाचा – बहुचर्चीत पीएम विश्वकर्मा योजनेचा फायदा काय, किती जातींना लाभ होणार? वाचा सविस्तर…
सध्या बाजारपेठेत डेअरीतील म्हशीच्या दुधाचा दर ६० ते १०० रुपयांवर आहे. गत दोन वर्षांत दुधाच्या दरात १० ते २० रुपये वाढ झाली आहे. याचा मोदक व पेढ्यांच्या किमतीवर परिणाम झाला. दुधाबरोबर खवा, गॅस व साखरेच्या दरातही सातत्याने वाढ झाली. बाजारात पांढरे, मिल्क व चॉकलेटी मोदक असे विविध मोदक सरासरी प्रतिकिलो ७०० ते १००० रुपये, तर गूळ आणि गव्हापासून बनवलेले चूर्म मोदक ६०० ते ७०० रुपये प्रति किलोच्या घरात आहे.
हेही वाचा – अकोल्यात पोलिसांकडून दत्तक गणेश मंडळ योजना; काय आहे विशेष? जाणून घ्या…
उकडीचे मोदक, अंजीर ड्राय फ्रूट, केसर, चंदेरी, पिस्ता, काजू कमल, काजू केसर व कंदी मोदक असे विविध प्रकार आहेत. ९०० रुपयांपासून ११०० रुपयांपर्यंत या पदार्थांचे दर आहेत.
दर प्रतिकिलोमध्ये
स्पेशल मावा मोदक : ७०० रुपये किलो
काजू कतली मोदक : ९०० रुपये
मोठा मोदक : १००० रुपये
केक पेढा मोदक : ८०० रुपये
बेसन मोदक :५०० ते ६०० रुपये
पेढा मोदक : ५०० रुपयांपासून ९०० रुपयांपर्यंत दर आहेत.