लोकसत्ता टीम

अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्‍या चिखलदरा नजीकचे गणपती संग्रहालय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या ठिकाणी एकाच छताखाली तब्‍बल सहा हजार गणेशमूर्ती ठेवण्‍यात आल्‍या आहेत. विदेशातील इंडोनेशिया, बँकॉक, सिंगापूर, चीन, नेपाळ येथून आणलेल्‍या गणेशमूर्तींचाही त्‍यात समावेश आहे.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथानजीक चिखलदरापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर हे नंद उद्यान – गणपती संग्रहालय आहे. या ठिकाणी संग्रहित गणेश मूर्तींमध्ये पितळ, तांबा, काच, फायबरच्‍या मुर्ती आहेत. अतिशय सूक्ष्म म्हणजे दुर्बीणमधून पाहण्यासारखे गणपती मोहरीवर, तिळावर, तांदळावर, पेन्सिलच्या टोकावर कोरीव गणपती, खडूंवरील गणेश शिल्प, औषधाच्या गोळ्यांचा गणपती, फुलांच्या पाकळ्यांचा गणपती अशा अनेक मूर्तींचा समावेश आहे.

आणखी वाचा-‘अजित’ची बंडखोरी, ‘रूपा’ पडलीय एकाकी; गडचिरोलीच्या जंगलात नेमके झाले काय?

अकोला येथील व्‍यावसायिक प्रदीप नंद आणि त्‍यांच्‍या पत्‍नी दीपाली नंद यांना गणपती बाप्‍पांच्‍या विविध रुपातील आणि वेगवेगळ्या आकारातील गणेशमूर्ती संग्रहित करण्‍याचा छंद होता. देश-विदेशातून आणलेल्‍या २ हजारावर गणेशमूर्तींचा संग्रह झाल्‍यावर त्‍याचे संग्रहालय करण्‍याची कल्‍पना त्‍यांना सुचली. चिखलदरा नजीक अडीच एकर जागेवर त्‍यांनी २०२०-२१ मध्‍ये हे संग्रहालय उभारले. आता या ठिकाणी सहा हजार गणेश मूर्तींचा संग्रह झाला आहे. पर्यटकांना नाममात्र शुल्‍क भरून हे संग्रहालय पाहता येते. एखाद्या भव्‍य तीर्थस्थानी आल्‍याचा आनंद या ठिकाणी मिळतो. आकर्षक प्रवेशद्वार या संग्रहालयाचे आहे. बाहेर छायाचित्रे काढता येतात. संग्रहाच्‍या आतील गणेशमूर्तींचे छायाचित्र घेण्‍याची परवानगी मात्र नाही.

आणखी वाचा-‘समृद्धी’वर आणखी एक ‘कलंक’! पशुधन चोरीचे प्रमाण वाढले, सहा अटकेत

आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने प्रदीप नंद आणि दीपाली नंद हे दाम्पत्य भारतभर फिरत असताना काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरातच्या किनाऱ्यापासून ते आसाम, वाराणसी, ओडिशा, कर्नाटक, केरळ येथे असणाऱ्या विविध शैलीतील गणपतींच्या मूर्ती त्यांनी खरेदी केल्या आणि या संग्रहालयात अतिशय सुसज्जपणे मांडल्या. या संग्रहालयात भारताच्या विविध भागासह चीन, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, थायलंडसारख्या देशामध्ये असणाऱ्या विविध स्वरूपातील गणपतीच्या मूर्ती देखील आणण्यात आल्या आहेत. काच, माती दगड, लाकूड धातू फायबर अशा विविध माध्यमात बनविलेल्या गणेश मूर्ती या संग्रहालयात पाहायला मिळतात. गणपतीची नाणी देखील या संग्रहालयात आहेत. अगदी बाल गणेशापासून भव्य दिव्य स्वरूपातील गणपतीचे दर्शन या संग्रहालयात घडते. क्रिकेट हॉकी फुटबॉल खेळणारे गणपती, विविध वाद्य वाजवतानाचे गणपती, २६ हजार पेन्सिल पासून साकारण्यात आलेला गणपती असेच सारे काही पाहताना पर्यटक आश्‍चर्यचकित होतात. या गणपती संग्रहालयाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे.