नागपूरच्या चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेची वादग्रस्त गणेशमूर्तीला यंदाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेची गणेशमूर्ती नागपुरातील वादग्रस्त गणेश म्हणूनही ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या वाद विवादला गणेशोत्सवात माध्यमातून लोकांसमोर दाखविण्यात आणले जाते.
गणेशोत्सवच्या काही दिवसांनी हा वादग्रस्त गणेशजी लोकांच्या दर्शनासाठी प्रदर्शित करण्यात येते, मात्र हे गणेश उत्सव मंडळावर पोलिसांच्या नेहमी नजर असते. आतापर्यंत अनेक प्रकरणे या वादग्रस्त गणेश मंडळावर पोलिसांनी दाखल केली आहे. या वर्षी या मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर देखावा केला होता त्यारून या वर्षी पण पोलिसांनी देखावा व गणेशमूर्ती आपल्या ताब्यात घेतली आहे.
पोलिसांनी हा मंडळाचा गणपती ज्या ठिकाणी बसवला जातो तिथे कारवाई केली. या कारवाईला विरोध करणारे अध्यक्ष चंद्रशेखर पुरी आणि काही कर्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. आमच्याकडे परवानगी असून तुम्ही कोणत्या नियमानुसार आम्हाला प्रतिबंध घालत आहात? असा प्रश्न या मंडळाने पोलिसांना विचारला. पोलीस आणि मंडळाच्या अध्यक्षांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. पोलिसांनी हा न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं. तसेच गणेश मूर्ती आणि देखावा असणाऱ्या ठिकाणाला पोलिसांनी टाळं लावलं आहे.
चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पुरी यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमच्याकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत असूनही पोलिसांनी बेकायदेशीरपणे यावर निर्बंध घातल्याचा आरोप केला आहे. “आम्ही गणपतीची पूर्ण तयारी केली. सर्वजण एकत्र जमले होते. काही पत्रकार आणि फोटोग्राफर आले होते. पोलिसांनी गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात येणारी जागेला चारही बाजूंनी वेढा घातला. त्यांनी १० ते १२ कार्यकर्त्यांना अडवलं,” असं पुरी यांनी सांगितलं. तसेच, “गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे तिथे त्यांनी आम्ही लावलेला टाळा काढून स्वत:चा टाळा लावला आहे. हा गणपतीची मूर्ती त्यांनी जप्त केली आहे,” असंही ते म्हणाले.
“उच्च न्यायालयाने या ठिकाणी गणपती उत्सवासाठी परवानगी दिल्याच्या आदेशाची प्रत आमच्याकडे आहे. मात्र पोलीस याचं उल्लंघन करत असून आम्हाला परवानगी दिली जात नाहीय,” असा आक्षेप पुरी यांनी घेतला आहे.