‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत उद्या, गुरुवारी घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी केली जात आहे. चितारओळीमधून सकाळपासून ढोलताशांच्या निनादात शहरातील आणि शहराच्या बाहेर गणपतींची मूर्ती नेली जात असल्यामुळे या भागात लोकांची गर्दी वाढली आहे.
बाप्पांच्या आगमनाची तयारी आज सुरू असून विविध भागात मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल शहरात लागले आहेत. पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठेमध्ये गर्दी दिसून आली. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडय़ाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना आज चांगली मागणी होती. सार्वजनिक गणेश मंडळात देखावे तयार केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. चिटणीस पार्कमध्ये मूर्तीकारांनी दुकाने थाटली असून त्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसून आली.
संती गणेशोत्सव मंडळासह रेशीमबागेतील नागपूरचा राजा आणि एचबी टाऊनमधील विदर्भाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेली गणेशमूर्ती ढोल ताशांच्या निनादात दुपारी चितार ओळीतून आणण्यात आली. चितारओळीत सकाळच्यावेळी झालेली गर्दी बघता तिकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद न केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. चितारओळीत मिळेल त्या जागेवर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे गणपतींच्या मोठय़ा मूर्ती चितारओळीतून बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाल, बडकस चौक आणि सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू मार्गावर दुपारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त
श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून दुपारी १.३० ही सर्वोत्तम वेळ आहे. शिवाय १२.३० ते ३.३० ही अमृत वेळ आहे. पार्थिव गणेशपूजनाचे हे व्रत भाद्रपद चतुर्थीला करायचे असते. त्यामुळे सूर्योदयापासून मंगलमूर्तीची (साडेसहा) प्रतिष्ठापना करता येईल. दुपारी दीडपूर्वी माध्यान्ह आरती व नैवेद्य दाखवणे अपेक्षित असल्याने त्यापूर्वी प्रतिष्ठापनेचा विधी पूर्ण होणे आवश्यक असले तरी दिवसवर चतुर्थी असल्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत पूजा करता येऊ शकते. दीड दिवसाचा गणपती ज्यांच्याकडे असतो त्यांनी ॠषीपंचमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी विसर्जन करावे. गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशाचे पार्थिव पूजन कुळाचाराप्रमाणे करावे. देवाघराजवळ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी म्हणजे देवाच्या पूजेनंतर लगेच गणेश मूर्तीची पूजा करता येते. देवघराजवळील वातावरण शुद्ध व पवित्र असावे, असेही राजंदेरकर यांनी सांगितले.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

महापालिकेच्या निर्देशांना केराची टोपली
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची शहरात विक्री होत असून महापालिकेच्या नियमांना आणि निर्देशाला त्यांनी केराची टोपली दाखविली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस विक्रेत्यांनी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असताना महापालिकेकडे फक्त ४६ विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर लाल रंगाची खूण करणे आवश्यक असताना ती केलेली दिसून येत नाही. शिवाय मूर्ती खरेदी केल्याची पावती दिली जात नसल्याची अनेक ग्राहकांनी तक्रार केली. चितारओळीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेऊ नका, असे आवाहन करणारे फलक लावण्यात आले असले तरी अनेक जण त्या मूर्त्यां खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून आले.