नागपूर: नागपूरसह राज्यभरात ७ सप्टेंबरला श्री गणेशाचे वाजत- गाजत आगमन झाले. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात सोन्याच्या दरात किंचित घट झाली होती. परंतु हळूहळू सात दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नागपूरसह देशात प्रथम सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु त्यानंतर कधी दर वाढले तर कधी कमी होत आहेत. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ७ सप्टेंबरला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ६०० रुपये होते. ६ सप्टेंबरच्या तुलनेत ७ सप्टेंबरचे दर बघता नागपुरात सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पुढे आले होते.

हे ही वाचा…आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…

दरम्यान गणेशोत्सवात सातत्याने सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी १४ सप्टेंबरला नागपुरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. १४ सप्टेंबरला दुपारी नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. नागपुरात १४ सप्टेंबरच्या तुलनेत ७ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दराची तुलना करता २४ कॅरेटचे दर प्रति दहा ग्राम २ हजार रुपये, २२ कॅरेटचे दर १ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचे दर १ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटचे दर १ हजार ३०० रुपये वाढलेले दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून हे दर आणखी वाढण्याचे संकेत असून ग्राहकांना सोने- चांदीत गुंतवणुकीची ही चांगली संधी असल्याचा दावा केला जात आहे.

हे ही वाचा…बुलढाणा : महादेवाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण पैनगंगेत बुडाला; तब्बल २० तासांनंतर…

चांदीच्या दरातही मोठी वाढ

नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी ७ सप्टेंबरला चांदीचे दर प्रति किलो ८४ हजार २०० रुपये होते. हे दर १४ सप्टेंबरला ८८ हजार ३०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात तब्बल ४ हजार १०० रुपये किलोची वाढ झालेली दिसत आहे. नागपुरात १४ सप्टेंबरला प्लॅटिनियमचे दर प्रति दहा ग्राम ४४ हजार रुपये होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsavs first day gold prices in nagpur fell but surged over next seven days raising consumer concerns mnb 82 sud 02