चंद्रपूर : किमान धन आरोग्य योजनेमध्ये सुपरवायझर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार तरुणाची तब्बल चार लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. मिलींद वासुदेव बुरांडे (४०) रा. चामोर्शी जि. गडचिरोली, किशोर जगताप (४२) रा. जळका ता. वरोरा असे अटकेतील आरोपींचे नाव असून अन्य एक फरार आरोपीचा तपास सुरू आहे. तर विनायक भाऊ पिपरे (४७) रा. कसरगट्टा ता. पोंभुर्णा असे फसवणूक झालेल्या बेरोजगाराचे नाव आहे.

मिलिंद बुराडे याने विनायक पिपरे याला आपण किमान धन आरोग्य योजनेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा सुपरवायझर असल्याची माहिती दिली. तुलाही नोकरी लावून देतो. परंतु, कंपनीत साडेआठ लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. विनायक नोकरी मिळेल या उद्देशाने पैसे देण्यास कबुल झाला. त्याला मिलिंद बुराडे यांनी चंद्रपूर येथे एका हॉटेलमध्ये बोलवले. यावेळी मिलिंदसह किशोर जगताप व अन्य एक व्यक्ती होता. या तिघांनी त्याच्याकडून नोकरी लावून देण्यासाठी चार लाख ६५ हजार रुपये घेतले. मात्र बरेच दिवस झाल्यानंतरही नोकरी लावून न दिल्याने विनायकने त्यांना विचारपूस केली. यावेळी टाळाटाळ करण्यात येत होती. त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मिलिंद बुरांडे व किशोर जगताप यांना बुधवारी अटक केली. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे करीत आहेत.

unemployed youth cheated under mukhyamantri yuva karya prashikshan yojana
भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
nashik youth murder latest marathi news
नाशिकमध्ये युवकाची हत्या, चार संशयित ताब्यात

हेही वाचा – नागपूर : जिवंत असताना देशसेवा केली, जग सोडतानाही आले समाजाच्या कामी

हेही वाचा – “गुन्हेगारीवर नियंत्रण अन् शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही उत्तम!” काय आहे वाशीम पोलिसांचा अभिनव उपक्रम, जाणून घ्या…

आरोपींवर वरोरा, नागपूर ठाण्यातही गुन्हे दाखल

पोलिसांनी अटक केलेल्या किशोर जगताप याच्यावर वरोरा, चंद्रपूर रामनगर तसेच नागपूर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात पुन्हा आरोपी असण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तवली आहे. पुन्हा किती लोकांची फसवणूक यांनी केली याचा तपास पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

Story img Loader