नागपूर : राजस्थानच्या अलवर गावातील बहुतांश युवक सायबर गुन्हेगारीत सहभागी आहेत. येथील सायबर गुन्हेगारांनी देशातच नव्हे तर विदेशातील लोकांचीही फसवणूक केली आहे. प्रत्येक युवक वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यात पटाईत आहे. बनावट फेसबुक आयडी, फेसबुक प्रोफाईल, सीमकार्ड आणि बँक खाते पुरविणारे पथक अशी वेगवेगळी कामे त्या युवकांना वाटून दिले आहेत. एक बनावट फेसबुक आयडी तयार करुन दिल्यानंतर सायबर गुन्हेगारांची मुख्य टोळी युवकांना दोन हजार रुपये देत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्या फेसबुक आयडीवरुन सायबर गुन्हेगार देशातच नव्हे तर विदेशातीलही नागरिकांची फसवणूक करीत होते. अशा आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा उलगडा नागपूर पोलिसांनी केला. बनावट फेसबुक खात्याच्या प्रकरणाचा तपास करीत असताना नागपूर पोलिसांना आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांची टोळी गवसली. या टोळीतील आरोपींनी देशभरात शेकडो लोकांना फसविले. त्यांच्या विरोधात देशभरात २२० तक्रारी असून त्यांची १६५८ बँक खाते सक्रिय आहेत.
हेही वाचा >>> माजी मुख्यमंत्र्यांचा नातू कारंजातून विधानसभेच्या मैदानात
विशेष म्हणजे, यातील बहुतांश बँक खाते भाड्यावर घेतल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले. सायबर पोलिसांनी यातील आरोपी सलीम खान याला अटक करून नागपुरात आणले आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक खात्याची माहिती तसेच मोठ्या प्रमाणावर बँक खाते पोलिसांना आहेत.
हेही वाचा >>> विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे गोंदिया ‘कनेक्शन’…
बनावट फेसबुक खाते तयार करुन देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली. टोळीच्या विरुद्ध देशभरात २२० तक्रारी असून त्यांनी आतापर्यंत १६५८ बँक खात्याचा वापर केला आहे. त्यांच्या ३६ बँकेचे ‘स्टेटमेंट’ पोलिसांच्या हाती लागले असून बँकेतून पाच कोटींच्यावर व्यवहार झाले आहेत.
विशेष म्हणजे यातील बहुतांश बँक खाते भाड्यावर घेतल्याचेही तपासात समोर आले. पोलिसांनी टोळीचा प्रमुख सलीम खान (२४, रा. अलवर) याला अटक करुन नागपुरात आणले आहे, अशी माहिती अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
६ राज्यात सर्वाधिक फसवणूक
सलीम खान या सायबर गुन्हेगाराच्या टोळीविरूध्द केरळ, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिलनाडू या राज्यातील सर्वाधिक नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून फसवणूक केली आहे. यासह अन्य राज्यातही राज्यात तक्रारी आहेत. महाराष्ट्रात १६ तक्रारी असून नागपूर शहरात दोन तक्रारी आहेत. याप्रकरणात अटक आरोपींविरुद्ध चार गुन्हे दाखल आहे. गुन्ह्यात वापरलेले हजारो बँक खात्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.
हरवलेल्या मोबाईलचे ‘पासवर्ड हॅक’
विजयकुमार रच्चावार यांचा मोबाईल हरविला होता. त्यांच्या हरविलेल्या मोबाईलचा ‘पासवर्ड हॅक’ करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने मोबाईलमध्ये असलेल्या ‘फोन पे अॅप’व्दारे त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून २५ हजार ८०० रुपये काढले. ती रक्कम भाड्याने घेतलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली. अशाप्रकारे हजारो हरविलेल्या मोबाईलमधील अॅपचा वापर करुन कोट्यवधी रुपये उकळले होते.