नागपूर : डझनभर गुन्हे दाखल असलेल्या चोरट्यांच्या टोळीने शहरातील मोबाईल शॉपी फोडून २६ लाखांचे मोबाईल उत्तरप्रदेशात नेले. चोरट्यांचा पोलिसांना सुगावा लागत नव्हता. शेवटी चोरांनीच चूक केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले. चोरट्याने एक मोबाईल बहिणीच्या मुलाला वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिला. त्याने लगेच सीमकार्ड टाकून मित्रांशी गप्पा सुरु केल्या. मोबाईल सुरु होताच पोलिसांना ‘लिंक’ मिळाली आणि उत्तरप्रदेशात छापा घालून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ८९ पैकी ७२ मोबाईल जप्त केले. मोहम्मद मुस्तकिम ऊर्फ सलमान मोहम्मद मुरसलीन (२६, डासना, जि. गाजीयाबाद-उत्तरप्रदेश) आणि मोहम्मद शहजाद मोहम्मद फारुख (४२. मेरठ-उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर तिसरा साथिदार शेख इकबाल (गाजियाबाद-उत्तरप्रदेश) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी पत्रपरिषदेत दिली.

तक्रारदार सचिन गावंडे यांनी उमरेड रोडवर स्मृतीनगरात संतकृपा नावाने मोबाईल विक्रीचे दुकान सुरु केले होते. १३ सप्टेबरला मध्यरात्रीनंतर मुस्तकीम, शहजाद आणि इकबाल यांनी फोडले होते. दुकानातून २६ लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरुन नेले होते. १४ सप्टेबरला सकाळी दुकान फोडल्याची घटना उघडीकस आली. हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चोरीचा तपास सुरु केला. या रस्त्यावर असलेल्या प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. तीन चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. मात्र, ते कोणत्या मार्गाने शहराबाहेर गेले, याबाबत स्पष्ट होत नव्हते. ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी रेल्वे स्थानक परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण केले. त्यात काही चोरटे रेल्वेने शहराबाहेर गेल्याचे लक्षात आले. त्यावरुन तपासाची दिशा ठरविल्याची माहिती उपायुक्त रश्मिता राव यांनी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
in pune thieves stolen sandalwood from army officers bungalow
पुणे : शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ- लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी
Pimpri, flood line Indrayani, Pavana, Mula,
पिंपरी : पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पूररेषेत २५०० अनधिकृत बांधकामे; महापालिकेने दिला ‘हा’ इशारा
Mobile thieves pune, Mobile theft pune,
पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा धुमाकूळ, ३०० जणांचे मोबाइल चोरी; नाशिक, मध्य प्रदेशातील चोरटे गजाआड
mixers juicers and tabs distribution to bandra women
‘खनिज क्षेत्र’ निधीतून मिक्सर, टॅबचे वाटप; खाणकाम उद्योगाने बाधित झालेल्यांचा निधी इतरत्र वळवण्यास विरोध
shivshardul percussion indian band in usa
अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती
Lahori bar nagpur, nagpur hit and run case,
नागपूर ‘हिट अ‍ॅण्ड रन’मुळे चर्चेत आलेल्या लाहोरी बारवर वरदहस्त कुणाचा?

हे ही वाचा…नागपूर हिट अँन्ड रन: रितिका मालूला मध्यरात्री अटक, सत्र न्यायालयाकडून दखल, स्वत:हून याचिका…

भाच्याला वाढदिवसाचे गिफ्ट देणे भोवले

आरोपी मोहम्मद मुस्तकीम याच्या भाच्याचा वाढदिवस होता. त्याला भाच्याला ‘बर्थडे गिफ्ट’ द्यायचे होते. त्यामुळे त्याने एक महागडा मोबाईल भाच्याला दिला. त्याने लगेच नवीन फोनमध्ये सीमकार्ड टाकले आणि मित्रांशी गप्पा मारणे सुरु केले. हुडकेश्वर पोलीस तांत्रिक तपासाच्या मागावर होते. मोबाईल सुरु होताच पोलिसांना गाजीयाबादची ‘लिंक’ मिळाली. पोलिसांनी गाजीयाबादमध्ये छापा घालून दोन आरोपींना अटक केली. तिसरा मात्र फरार झाला.

हे ही वाचा…अखेर दीक्षाभूमीवर खोदलेले खड्डे बुजवले, धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज

टेहळणी करुन हेरायचे मोबाईल शॉपी

टोळीचा म्होरक्या मुस्तकीम याच्यावर बेळगाव- कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अकोला शहरात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यात तो फरार होता. त्यानंतर त्याने अनेक ठिकाणी घरफोडी-चोरी केली. सध्या त्यांनी मोबाईल शॉपी फोडण्याचा सपाटा सुरु केला होता. त्यासाठी टोळी दिवसभर टेहळणी करत होते. लक्ष्य गाठून मध्यरात्रीनंतर चोरी करीत होते.