नागपूर : डझनभर गुन्हे दाखल असलेल्या चोरट्यांच्या टोळीने शहरातील मोबाईल शॉपी फोडून २६ लाखांचे मोबाईल उत्तरप्रदेशात नेले. चोरट्यांचा पोलिसांना सुगावा लागत नव्हता. शेवटी चोरांनीच चूक केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले. चोरट्याने एक मोबाईल बहिणीच्या मुलाला वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिला. त्याने लगेच सीमकार्ड टाकून मित्रांशी गप्पा सुरु केल्या. मोबाईल सुरु होताच पोलिसांना ‘लिंक’ मिळाली आणि उत्तरप्रदेशात छापा घालून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ८९ पैकी ७२ मोबाईल जप्त केले. मोहम्मद मुस्तकिम ऊर्फ सलमान मोहम्मद मुरसलीन (२६, डासना, जि. गाजीयाबाद-उत्तरप्रदेश) आणि मोहम्मद शहजाद मोहम्मद फारुख (४२. मेरठ-उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर तिसरा साथिदार शेख इकबाल (गाजियाबाद-उत्तरप्रदेश) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी पत्रपरिषदेत दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा