पतीच्या मित्रानेच केले दृष्कृत्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : एका १९ वर्षीय महिलेवर सहा जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी महिलेची अश्लील चित्रफितही तयार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून चार जणांना शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी ३० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

छोटेबाबा ऊर्फ शेख शरीफ शेख (२७) रा. महाल किल्ल्याजवळ आणि अजय ऊर्फ बंटी अक्षय श्रीवास (२७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जानेवारी २०१८ मध्ये पीडितेचा एका तरुणाशी प्रेमविवाह झाला. या विवाहाला तिच्या आईवडिलांचा विरोध असल्याने त्यांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले. विवाहानंतर ती पती व सासू-सासऱ्यांसह राहात होती. दरम्यान,  घर छोटे असल्याने विवाहानंतर तिच्या पतीने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांपासून ते भाडय़ाच्या घरी राहात आहेत.

आरोपी छोटेबाबा हा तिच्या पतीचा मित्र आहे. त्यामुळे तो नेहमी घरी ये-जा करायचा. दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या सुमारास तो कचोरी व समोसे घेऊन घरी आला. पीडित महिलेचा पती दारू प्राशन करून घरात झोपलेला होता. आरोपीने आणलेली कचोरी तिने खाल्ली असता ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला व अश्लील चित्रफित तयार केली. तिने दुसऱ्या दिवशी पतीच्या मित्रास जाब विचारला असता त्याने अश्लील चित्रफित दाखवली व कुणाकडे वाच्यता केल्यास फेसबुकवर चित्रफित अपलोड करण्याची धमकी दिली.

बदनामीच्या भीतीने पीडित महिला शांत बसली. तेव्हापासून छोटेबाबू हा स्वत: इतरांना घेऊन येतो व बलात्कार करतो. १६ डिसेंबरला त्याने पुन्हा तोच प्रकार केला. त्याशिवाय काहींनी अनैसर्गिक अत्याचारही केला. शेवटी अत्याचार असह्य़ झाल्याने तिने पतीला सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांडेकर यांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती गांगुर्डे यांनी दिली.

देहव्यापारासाठी दबाव

आरोपी छोटेबाबा हा अश्लील चित्रफितीच्या आधारावर पीडितेला ब्लॅकमेल करीत होता. स्वत:च्या फायद्यासाठी तो तिला देहव्यापार करण्यास सांगत होता. तिने नकार दिला की बदनामी करण्याची धमकी द्यायचा. आरोपी हा लोकांना घेऊन यायचा व तिच्यावर बलात्कार करायला लावायचा. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा.