अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर: शहरात ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावावर ‘ऑनलाईन सेक्स रॅकेट’ चालवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अनेक संकेतस्थळांवर तरुणींचे छायाचित्र ‘अपलोड’ करून खुलेआम देहव्यापार सुरू आहे. मात्र, गुन्हे शाखेचे पथकातील काही कर्मचाऱ्यांची दलालांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Hindenburg Research winds down
Hindenburg Research : अदाणी समूहाबाबत अहवाल देऊन खळबळ माजवणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चला कुलूप, संस्थापकांनी लिहिली भावूक पोस्ट
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच
Pune ranks fourth in the world in slow traffic Pune print news
मंद वाहतुकीत पुणे जगात चौथे
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य

गेल्या काही महिन्यांपासून उपराधानीत ‘ऑनलाईन’ स्वरूपात देहव्यापार सुरू आहे. नागपुरातील अनेक दलालांनी सेक्स रॅकेट चालवण्यासाठी थेट इंटरनेटवर संकेतस्थळ तयार करून जाहिराती करणे सुरू केले आहे. इंटरनेटवर ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावाखाली नागपुरातील अनेक तरुणींचे छायाचित्र आणि थेट भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. दलालांनी स्वतःचे ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक दिले असून त्यावर संपर्क केल्यास लगेच प्रतिसाद देण्यात येतो.

हेही वाचा… नागपुरात सुसाट स्कूलबस, व्हॅन, ऑटोंमुळे शालेय मुलांचे जीव धोक्यात; वाहतूक पोलिसांची कारवाई नाममात्र

संपर्क करणाऱ्या आंबटशौकिनांची संपूर्ण माहिती घेण्यात येते. ग्राहकाला मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचे आश्वासन दिले जाते. ग्राहकांना अर्धनग्न छायाचित्र भ्रमणध्वनीवर पाठवून निवड करण्याचा पर्याय दिला जातो. प्रत्येक छायाचित्रासह रक्कमसुद्धा टाकण्यात येते. यासाठी दलाल हे सांकेतिक भाषेचा उपयोग करीत असून केवळ ‘व्हॉटसॲप कॉल’वर व्यवहार करतात. तर ‘व्हिडीओ कॉल’वर तरुणीचा चेहरा दाखवण्यात येतो.

हेही वाचा… नागपुरात नियमबाह्य ‘स्कुलबस’ची नाकाबंदी; किती बसवर झाली कारवाई? जाणून घ्या…

व्यवहार ठरल्यानंतर ‘पेटीएम, गुगल पे’ किंवा ‘पेमेंट ॲप्स’द्वारे पैसे स्वीकारले जातात. सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, सदर, अंबाझरी, रामदासपेठ, बेलतरोडी, पंचशील चौक, फुटाळा, अंबाझरी तलाव अशा गजबजलेल्या ठिकाणावरून दलाल मुलींना आंबटशौकीन ग्राहकांच्या ताब्यात देण्यात येतात.

उच्चशिक्षित तरुणी देहव्यापारात

इंटरनेटवरील ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावावर अनेक उच्चशिक्षित तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी देहव्यापाराच्या दलदलीत उतरल्या आहेत. शिक्षणासाठी पैसा किंवा घरभाडे, महिन्याभराचा खर्च किंवा महागडे शौक पूर्ण करण्यासाठी नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी देहव्यापार करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणींसह विवाहित महिलासुद्धा जाळ्यात

अनेक दलाल अल्पवयीन मुली, तरुणी, विद्यार्थिनी आणि विवाहित महिलासुद्धा जाळ्यात ओढतात. त्यांना सुरुवातीला आंबटशौकीन ग्राहकांकडून मोठी रक्कम देतात. त्यामुळे त्या दलालांच्या संपर्कात राहतात. ग्राहकांना पाठवण्यासाठी मुली-तरुणींचे अर्धनग्न छायाचित्र काढतात. त्यानंतर तरुणींनी देहव्यापार करण्यास नकार दिल्यास तिला छायाचित्र कुटुंबाला किंवा नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन ‘ब्लॅकमेल’ करतात.

Story img Loader