नागपूर: नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्ग लोकार्पणानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी गाजत आहे. आता पर्यंत अपघातामुळे प्रसिध्दीस आलेला हा महामार्ग आता त्याला जोडणा-या रस्त्यावर होत असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरीमुळे चर्चेत आला आहे.
समृद्धी महामार्ग नागपूर लगत हिंगणा तालुक्यातून सुरू होऊन वर्धा, अमरावती जिल्ह्यातून पुढे जातो.प्रत्येक जिल्ह्यात महामार्गा लगतच्या गावांना रस्ता जोडला जातो. वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात अशाच काही रस्त्यावर रात्रीच्या वेळी उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
हेही वाचा… बुलढाणा अपघात घटना थेट लोकसभेत; कुटुंबीयांनी केली होती मागणी
गुरुवारी २० जुलैला गुडगावच्या प्रेम मोटर्सचे काही ट्रेलर गोंडखैरी ते बुटीबोरी या समृद्धी महामार्गाला जाणाऱ्या रस्त्यावर उभे होते. रात्री वाहनचालक झोपले असताना चोरट्यांनी ट्रकमधील ४५० लिटर डिझेल चोरले. सकाळी चालकांना जाग आली तेव्हा त्यांना डिझेलच्या टाक्यांचे कुलूप तुटल्याचे दिसून आले.