वर्धा: विविध बेकायदेशीर घटनेत अनेक गुन्हे दाखल झाले असलेल्या हिंगणघाट येथील कुख्यात गुंड गज्या हंडी उर्फ गज्या खंगार याचा दोन दिवसापूर्वी दगडाने ठेचून तसेच कुऱ्हाडीने वार करीत निर्घृण खून करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणी प्रशांत मनोहर राऊत, मयूर सदाशिव कोराटे, बंटी गजानन खडसे तसेच सचिन विनोद क्षत्रिय हे खून करीत फरार झाले होते. त्यांचा कसून तपास सुरू झाला. तिघांना अटक झाली पण प्रशांत राऊत हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

हेही वाचा… माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात, राष्ट्रवादीचे सोडून गेलेले आमदार पुन्हा परतणार…

अखेर तो यवतमाळ लगत एका शेतातील मचानावर लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शेतशिवारात शोध मोहीम राबविल्यावर तो हाती लागला. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गज्याचा खून हा जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.