चंद्रपूर : अनेक गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड व दहशत निर्माण करणाऱ्या दीपक कैथवास (२८) या गुंडाची पाचजणांनी बुधवार १४ जूनच्या मध्यरात्री हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बल्लारपूर शहरात मौलाना आझाद वॉर्डात ही घटना घडली.
बल्लारपूर शहरातील रवींद्र वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या दीपक कैथवास या युवकाने सर्वत्र दहशत निर्माण केली होती. दीपक कैथवास याच्यावर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहे, तो नेहमी कुणासोबतही भांडण करायचा, धमकवायचा, वाद घालत होता, त्यामुळे परिसरात त्याची दहशत होती. दीपक हा परिसरातील नागरिकांना मारहाण करायचा, त्यांना त्रास द्यायचा, आरोपी युवकांना दीपकने अनेकदा मारहाण केली होती. त्या मारहाणीचा बदला व त्याची निर्माण झालेली दहशत संपविण्यासाठी बुधवारी रात्रीच्या सुमारास दीपकला पाच युवकांनी गाठले, दिपकवर लोखंडी रॉड, लाठी काठीने जोरदार वार करण्यात आले.
हेही वाचा – नागपूर : रेल्वे प्रशासनाची ‘ती’ चूक प्रवाशांना पडली महागात…
या मारहाणीत दीपकचा मृत्यू झाला, सर्व आरोपी हे १८ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती आहे, घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.