राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : देशात गांज्यावर बंदी असलीतरी विविध राज्यातून दिल्लीकडे रेल्वे मार्गाने मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी केली जात असल्याची बाब समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर येथील रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या १३ महिन्यांत जप्त केलेला गांजा आंध्रप्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड येथील असल्याचे व तो दिल्लीकडे जात असल्याचे समोर आले आहे.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
excise department registered 226 cases of illegal liquor traffic in suburbs
अवैध मद्य वाहतुकीबद्दल उपनगरात २२६ गुन्हे दाखल

नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस कायद्याच्या (एनडीपीएस) कलम २० प्रमाणे गांज्याचे उत्पादन, विक्री, खरेदी, निर्यात, आंतरराज्यीय व्यापार करणे गुन्हा आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ एप्रिल २०२४ या कालावधीत आरपीएफ, नागपूरने १५ रेल्वेगाड्यांमधून ८२ किलो ७७७ ग्रॅम गांजा जप्त केला.

आणखी वाचा-नागपूर : आमदार कृष्णा खोपडेंची आर्थिक फसवणूक, ठकबाजाने…

छत्तीसगडमधील रायपूर आणि दुर्ग, आंध्रप्रदेशमधील विजयवाडा आणि ओडिशामधील कांटबांजी या शहरातून आरोपी गांजा घेऊन रेल्वेगाडीत बसले. नागपूरमध्ये आंध्र प्रदेश एक्सप्रेसमध्ये चारवेळा, रायगड ते हजरत निझामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेसमधून चार वेळा, तांबरम (चेन्नई) ते नवी दिल्ली ग्रँड ट्रँक एक्सप्रेसमध्ये दोन वेळा, विशाखापट्टनम ते हजरत निझामुद्दीन समता एक्सप्रेसमधून दोन वेळा गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत २८ लाख ८ हजार ४७० रुपये आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली.

ठरलेल्या गाड्यांमधून तस्करी

दुर्ग येथून हजरत निझामुद्दीनला नेण्यात येत असलेला ५.१९३ किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत ७७ हजार ८९५ रुपये आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली. रायपूरहून बिनाकडे जात असलेला ४.६७० किलो गांजा सापडला. यात एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याची किंमत ३२ हजार रुपये आहे. विजयवाडा येथून नवी दिल्लीकडे जात असलेला १२.२५५ किलो गांजा नागपूर येथे जप्त करण्यात आला. त्याची किंमत १ लाख ८३ हजार ८२५ रुपये होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

आणखी वाचा-विदर्भातील गावरान आंबा झालाय दुर्मिळ, लोणच्यासाठी भिस्त ‘या’ राज्यावर

तर कांटबांजीहून निघालेला २.०१८ किलो गांजा नागपुरात जप्त करण्यात आला. याची किंमत ३० हजार ७० रुपये आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. याशिवाय इतर गाड्यांमधून ५८.६४ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत २४ लाख ८४ हजार ४८० रुपये आहे. पकडले जाण्याच्या भीतीने अज्ञात व्यक्तीने ५८.६४ किलो गांजा सोडून दिला. त्याची किंमत २४ लाख ८४ हजार ४८० रुपये आहे, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मनोजकुमार यांनी सांगितले.

  • १५ रेल्वेगाड्यांमधून ८२ किलो ७७७ ग्रॅम गांजा जप्त
  • नागपूर रेल्वे पोलिसांची कारवाई