अकोला : शहरातील व्यावसायिक व गणेशभक्त प्रदीप नंद यांनी आपल्या छंदातून देश, विदेशातील लक्षवेधी गणरायाच्या मूर्तींचे संकलन केले. त्या सहा हजार मूर्तींचे अनोखे संग्रहालय मेळघाटातील चिखलदाराजवळ मोथा गावात साकारण्यात आले आहे. एकाच छताखाली हजारो वैविध्यपूर्ण गणपतींचे दर्शन होत आहे. अतिशय सूक्ष्म स्वरूपापासून ते सहा फूट उंचीपर्यंत मूर्ती संग्रहालयात आहेत. मेळघाटात वर्षभर येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हे गणपती संग्रहालय आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

विविधरुप, स्वरूप आणि आकारातील गणरायाचे संग्रहालय अकोल्यातील प्रदीप आणि दीपाली नंद दाम्पत्याने मेळघाटात साकारले आहे. नंद यांनी अगदी लहानपणापासूनच गणपतीच्या विविध मूर्ती संकलनाचा छंद जोपासला. घरामध्ये हजारो गणपती जमा झाले. संपूर्ण भारतासह परदेशातून देखील वेगळ्या स्वरूपाचे गणपती सातत्याने त्यांनी जमा केले. आई माधुरी व वडील मधुसूदन नंद यांनी त्यांना संग्रहालय उभारण्याचा सल्ला दिला. निसर्गाच्या सानिध्यात तीन एकर जागेत अतिशय सुंदर संग्रहालय २०२० मध्ये उभारण्यात आले. प्रारंभी या ठिकाणी पाच हजार गणपती होते. आता संग्रहालयात सुंदर, रेखीव मूर्तींची संख्या सहा हजारावर पोहोचली. दक्षिण भारतातील मंदिरांप्रमाणे भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार संग्रहालयाचे आहे. संग्रहालयाचा परिसरील गणपतीचे विविधरुपे पाहून भाविक आकर्षित होतात.

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

हेही वाचा – पंतप्रधान मोदी २० ला वर्धेत! देशभरातून २० हजार ‘विश्वकर्मा’ हजेरी लावणार

देश, विदेशातील आकर्षक गणराया

काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरातच्या किनाऱ्यापासून ते आसाम, वाराणसी, ओडिसा, राजस्थान, केरळ, कर्नाटक, बंगाल येथे असणाऱ्या विविध रूपातील गणपतीच्या मूर्ती संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. संग्रहालयात चीन, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, थायलंड, सिंगापूर सारख्या देशातील विविध स्वरूपातील गणपतींचे देखील दर्शन होते. चांदी, पितळ, तांबे, लोखंड, ग्रॅनाईट, मोती, शिंपले, रुद्राक्ष, पेन्सिल, साबण, शर्टची बटने, काच, माती, दगड, लाकूड, फायबर आदींद्वारे बनविलेल्या गणेश मूर्ती संग्रहालयात बघायला मिळतात. गणपतीची नाणी, चौसष्ठ कला स्वरूपातील गणराया, बाळ गणेशापासून भव्यदिव्य स्वरूपातील गणपतीची मूर्ती संग्रहालयात आहेत. गवताच्या अतिशय बारीक पात्यावर, धान्यांचे दाणे, खडू यावर देखील मंगलमूर्ती घडवलेले येथे दिसून येतात. पर्यटकांसह गणेशभक्तांसाठी हे संग्रहालय एक पर्वणीच ठरत आहे.

विविध स्वरूपातील गणपतीचे आकर्षण

क्रिकेट, हॉकी, कबड्डी, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबलटेनिस, खोको, वाहन चालवताना, शेतकरी स्वरूपातील गणपतीच्या मूर्ती देखील पर्यटकांना आकर्षित करतात. त्याचप्रमाणे विविध वाद्य वाजवतानाचे गणपती, २६ हजार पेन्सिलीपासून बनवलेले गणेश तर पर्यटकांना भारावून टाकतात.

हेही वाचा – सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार.. काय आहे ‘कुरिअर स्कॅम’?

तीर्थस्थानी आल्याचा प्रत्यय

गणपती संग्रहालयामध्ये सहा हजाराहून अधिक विविध स्वरूपातील गणरायाचे दर्शन घडून येते. येथे फेरफटका मारताना आपण तीर्थस्थानी आल्याचा प्रत्यय येतो, असे डॉ. नंद गणपती संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. माधव देशमुख यांनी सांगितले.