नागपूर: नागपुरातील बिडगाव परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्परने सायकलवर जाणाऱ्या बहीण-भावाला चिरडले. शुक्रवारी सकाळच्या घटनेनंतर संतप्त जमावाने दगडफेक करत ट्रक पेटवल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी येथे तगडा बंदोबस्त लावत राज्य राखीव दलाच्या पोलिसांनाही पाचारण केले.

अंजली ननेलाल सैनी (२०) आणि सुमित ननेलाल सैनी (१५) दोघे. रा. अंबेनगर बिडगाव अशी मृतकांची नावे आहेत. दोघेही बहीण-भाऊ आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी डम्पींग यार्ड आहे. या परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्परची सतत रेल-चेल असते. दरम्यान बिडगाव चौकात सायकलवरून जात असलेल्या अंजली आणि सुमित यांना कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली.

two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
10 kg ganja seized in pune
मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणारे गजाआड, खडकी परिसरात कारवाई; दहा किलो गांजा जप्त
In Kendur village cousin was nearly crushed under car over land dispute
Video : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
BJP worker was stoned to death in Pavananagar in Maval
मावळातील पवनानगरमध्ये भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!

हेही वाचा – यवतमाळ : हॉटेल, ढाब्यावर नववर्ष साजरे करताय? मग हे वाचाच…

हेही वाचा – लग्नाचे आमिष दाखवून इंस्टाफ्रेंडचा तरुणीवर बलात्कार

टिप्परच्या चाकाखाली सापडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती. घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. टिप्परला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण केले गेले. परंतु संतप्त नागरिकांनी अग्निशमन दलाच्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थली पोहोचले. जमाव संतप्त होत असल्याचे पाहून राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण केले गेले. यावेळी पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवले.