अमरावती : केंद्र शासनाच्‍या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबागांच्या माध्यमातून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १ हजार ५७८ शाळा व विद्यालयांमध्ये परस बागा फुलणार असून, या माध्यमातून विद्यार्थ्‍यांना निसर्गाशी जवळीक साधण्‍याची संधी मिळणार आहे.

पोषण शक्ती निर्माण योजनेत परसबाग निर्माण करण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी शाळा स्तरावर सूचना दिल्या आहेत. त्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धाही घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी परस बागेत पिकवलेला भाजीपाला, फळे आदींचा पोषण आहारात उपयोग केला जाणार आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शाळांमध्ये परसबाग निर्माण करून त्यामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे.

हेही वाचा – एकतर्फी प्रेमात आकंठ बुडाला, मोबाईलच्या युगात प्रेमपत्राद्वारे तरुणीला द्यायचा त्रास; हस्ताक्षरावरून अडकला अन्…

हेही वाचा – अमरावतीत एसटी महामंडळाचे ११ कर्मचारी निलंबित; कारण काय, जाणून घ्या…

परसबागेतून उत्पादित ताजा भाजीपाल्याचा वापर पोषण आहारामध्ये करावा. परसबागेतील भाजीपाल्यांमध्ये मेथी, वाल, हरभरा, मूग, बीट, मका, मुळा, मोहरी, सूर्यफूल, कांदा, वाटाणा, चवळी, पालक, राजमा आदींची लागवड करावी, असे निर्देश आहेत.

Story img Loader