गोंदिया : टोमॅटो, कांद्यानंतर आता लसणाचे भावही गगनाला भिडले आहे. दररोजच्या जेवणातील भाजीत किंचित पण महत्त्वाचा घटक असलेल्या लासणाला वर्षभर मागणी असतेच. मात्र, अलीकडे लसणाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने गृहिणींचे किचन बजेट गडबडले आहे.

आजघडीला गोंदियातील किरकोळ भाजी बाजारात लसणाची किंमत ३२० ते ३५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, अवकाळी पाऊस आणि खराब वातावरणामुळे पिकाचे नुकसान झाले, याचा उत्पादनावर विपरित परिणाम झाला. शिवाय, आवकही कमी झाली आहे. त्यामुळे लसणाचे दर वाढले असून यापुढे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – रानटी हत्तींचा धुडगूस, धानाची नासधूस; गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात पुनरागमन

हेही वाचा – धर्मांतरित आदिवासींना आरक्षण, भाजपाच्या मागणीने गदारोळ

गोंदियातील ठोक भाजी बाजारात शेजारील मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरातमधून लसणाची आवक होत आहे. खराब वातावरणामुळे लसणाच्या दर्जावरही फरक पडला आहे. लसणाच्या कमी आवकमुळे मागील काही आठवड्यांत किमतीत मोठी वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, स्थितीत लवकर सुधारणा होण्याची शक्यता नाहीच. पण जानेवारीच्या शेवटपर्यंत नवीन पीक आल्यावरच या वाढलेल्या किमतींपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

Story img Loader