सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ६१ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रातून बहुजन रंगभूमी नागपूरने सादर केलेल्या ‘गटार’ नाटकाला प्रथम तर गुलमोहर बहुउद्देशीय संस्थेने सादर केलेल्या ‘अंधार उजळण्या’साठी नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मीनगर येथील सायंटिफीक सभागृहात १६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान राज्य नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण १७ नाटक सादर करण्यात आले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नाटकाची संख्या कमी असली तरी सर्वच नाटके दर्जेदार सादर करण्यात आली. या स्पर्धेत तृतीय पारितोषिकासाठी संजय भाकरे फाऊंडेशनच्या ‘मोक्षदाह’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे परीक्षण विष्णू केतकर, संदीप देशपांडे आणि सुषमा कोठीकर यांनी केले.

हेही वाचा: कोळसाधारित जुन्या विद्युत प्रकल्पांमुळे राज्याला ५७०० कोटींचा लाभ शक्य; ‘क्लायमेट रिस्क होरायझन्स’चा अभ्यास अहवाल

स्पर्धेचा निकाल

दिग्दर्शन – प्रथम पारितोषिक श्रेयस अतकर (गटार), द्वितीय- रमेश लखमापुरे (अंधार उजळण्यासाठी) प्रकाश योजना – प्रथम – किशोर बत्तासे (गटार), द्वितीय रमेश लखमापुरे (अंधार उजळण्यासाठी), नेपथ्य – प्रथम – एस.एन. म्हैसके (गटार), द्वितीय – दीपाली घोंगे (अंधार उजळण्यासाठी), रंगभूषा – प्रथम – नेहा मून (गटार), द्वितीय – लालजी श्रीवास (अंधार उजळण्यासाठी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक – आशीष दुर्गे (गटार), डॉ. दीपलक्ष्मी भट (अंधार उजळण्यासाठी)

हेही वाचा: नागपूर: अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काढला काटा

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र – मयूरी टोंगळे (ठिय्या), मीनाक्षी बोरकर (बानी बानो), लक्ष्मी कोल्हे (हट्ट), अनिता जोशी (मोक्षदाह), प्राची जांभुळकर (गटार), मिलिंद वरघणे (हट्ट), अजय सनसेर (दोन वेडे आणि तो), संजय भाकरे (मोक्षदाह), रोहित वानखेडे (गटार), पराग घोंगे (अंधार