नागपूर : मिठाई, जाम, जेली, कँडी यांमध्ये जाडसरपणा आणणे, सॉफ्ट आणि हार्ड कॅप्सुलचे कव्हर, फेस मास्क, सौंदर्य प्रसाधन निर्मिती, फोटो फिल्म, पेंट, डिंक निर्मिती, सर्जरी स्पंज, रक्तस्राव रोखणे, दूध किंवा दही घट्ट करणे, डेअरी उत्पादनात स्थिरता आणणे, मांस रोल्स, हॅम आणि सॉसेज, जैविक पॅकेजिंग, पेय उद्योगामध्ये जिलेटीनचा वापर होतो. या जिलेटिनच्या निर्मितीसाठी आता बॉयलर कोंबडी मधून वाया जाणारे जाणाऱ्या घटकाचा वापर केला जाणार आहे. चिकनसाठी ब्रॉयलर कोंबडी कापल्यानंतर तब्बल ३७ टक्‍के वाया जाणारे घटक (वेस्ट) मिळतात. यापासून जिलेटीन निर्मितीसाठी उदगीर येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील तज्ज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे जिलेटीन मिळविण्यासाठी पहिल्यांदाच फूड ग्रेड घटकांचा वापर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिलेटीनचा वापर कशासाठी?

खाद्य पदार्थ, औषधी तसेच सौंदर्य प्रसाधने आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये जनावरांची त्वचा, हाडांपासून तयार होणाऱ्या जिलेटीनचा वापर केला जातो. कोंबडी, वराह, जनावरे आणि माशांच्या टाकाऊ घटकांपासून जिलेटीन तयार करतात. चिकनसाठी कोंबडी कापल्यानंतर केल्यानंतर त्वचा, हाडे आणि पाय हे वाया जाणारे घटक मिळतात. यापासून जिलेटीन तयार करण्यासाठी फूडग्रेड घटकांचा वापर करण्यात ‘माफसू‘मधील तज्ज्ञांना यश आले आहे.

हेही वाचा >>>Bachchu Kadu : “अजित पवार गटाचे अर्धाहून अधिक आमदार…”; प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा!

कुठल्या जनावरांपासून किती जिलेटीन मिळते?

हैदराबाद येथील मांस संशोधन संस्थेचे सहकार्य यासाठी मिळाले आहे. या संशोधनामुळे कोंबडी कटिंग नंतर टाकाऊ घटकांना देखील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. सध्या हैदराबाद परिसरात यावर आधारित एक उद्योग कार्यरत आहे. कोंबडी त्वचेपासून १० ते १५ टक्के, वराहाच्या त्वचेपासून ४६ टक्के, जनावरांच्या चामड्यापासून २९.४ टक्के, जनावरांच्या हाडांपासून २३.१ टक्के आणि माशांपासून १.५ टक्‍के जिलेटीन मिळते.

हेही वाचा >>>स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…

संशोधक काय म्हणतात ?

पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालय उदगीरचे प्राध्यापक डॉ. मोहम्मद रजियोद्दीन यांनी सांगितले की, जिलेटीन निर्मितीमध्ये प्रामुख्याने रसायनांचा वापर होतो. परंतु आम्ही कोंबडी वेस्टपासून जिलेटीन तयार करण्यासाठी पहिल्यांदाच ॲसिटिक ॲसिड या फूड ग्रेड घटकाचा वापर केला. हा घटक खाद्यान्न म्हणून सुरक्षित आहे. माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांज सांगितले की, मिठाई, जाम, जेली, कँडी यांमध्ये जाडसरपणा आणणे, सॉफ्ट आणि हार्ड कॅप्सुलचे कव्हर, फेस मास्क, सौंदर्य प्रसाधन निर्मिती, फोटो फिल्म, पेंट, डिंक निर्मिती, सर्जरी स्पंज, रक्तस्राव रोखणे, दूध किंवा दही घट्ट करणे, डेअरी उत्पादनात स्थिरता आणणे, मांस रोल्स, हॅम आणि सॉसेज, जैविक पॅकेजिंग, पेय उद्योगामध्ये जिलेटीनचा वापर होतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gelatin used for sweets jams jellies candies will be made from boiler chicken waste nagpur dag 87 amy