गोंदिया : राज्य शासनाच्या शाळा दत्तक देण्याच्या योजनेच्या निर्णयाला संपूर्ण राज्यातून विरोध होत आहे.  या योजनेमुळे गोर-गरिबांच्या मुलाचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका माजी विद्यार्थ्याने किडनीच्या मोबदल्यात शाळा दत्तक देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहाडी येथील लोकेश सोहनलाल कावळे यांनी गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. लोकेश यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे शाळा दत्तक योजनेंतर्गत माझी मराठी प्राथमिक शाळा मला माझी किडनी घेऊन दत्तक द्या, अशी मागणी केली. शाळा दत्तक घेण्याकरिता लागणारी रोख रक्कम माझ्याकडे सध्या नसल्यामुळे मी महाराष्ट्र शासनाला माझी एक किडनी देण्यास तयार असल्याचे  पत्रात म्हटले आहे.

…तर दुसरी किडनीही घ्या

लोकेश यांनी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी एक किडनीच्या मोबदल्यात शासनाकडे आपली शाळा दत्तक मागितली आहे. मात्र, एक किडनी विकून हे शक्य नसेल तर दुसरी किडनीदेखील देण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

प्राथमिक शाळांच्या प्रेमापोटी…

आपण स्वच्छेने व अतिशय स्वच्छ विचाराने, कोणतेही नशापाणी न करता पूर्णपणे शुद्धीवर राहून संपूर्ण महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या मुलांच्या भविष्याचा शैक्षणिक विचार करून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी प्राथमिक शाळांच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला असल्याचे ही लोकेश कावळे यांनी पत्रात म्हटले आहे.