चंद्रपूर : चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे खासदार व आमदार निवडून आणण्यासाठी अनेकांना मदत केली. मात्र निवडून आल्यानंतर माझ्या विरोधात गेले ही वस्तुस्थिती आहे, असे काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

येत्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिका निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. तर त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका आहे. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सोबत येत असेल तर आम्ही त्यांना सोबत घेण्यास तयार आहोत, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, अशा सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा कोण उचलणार? अजित पवार गटाकडून ३ हजार शपथपत्रांची तयारी

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर तथा खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर वीज केंद्राच्या हिराई विश्रामगृहावर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संघटनात्मक बाबींची चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा कोण उचलणार? अजित पवार गटाकडून ३ हजार शपथपत्रांची तयारी

या बैठकीला पदमुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, महिला काँग्रेस माजी अध्यक्ष चित्रा डांगे, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रदेश युवक काँग्रेस सचिव राजेश अडूर, संताेष लहामगे, प्रवीण पडवेकर, कुणाल चहारे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader