नागपूर : दरवर्षी २२ आणि २३ एप्रिल रोजी दिसणारा लायरीड उल्कावर्षाव (Lyrid Meteor Shower) या वर्षीसुद्धा चांगला दिसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखेदरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा (lyra) तारासमुहात दिसणारा हा उल्कावर्षाव २२-२३ रोजी मोठ्या संख्येने दिसतो अशी माहिती खगोल अभ्यासक व स्काय वाच गृपचे अध्यक्ष, प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

उत्तर-पूर्ण दिशेला सूर्य मावळल्यानंतर लायरा तारा समुहात वेगा (Vega) ताऱ्याजवळ हा उल्कावर्षाव पाहता येईल. रात्री १०.३० वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत हा चांगला दिसू शकेल. या वर्षी ताशी १५ ते २५ उल्का दिसू शकेल असा अंदाज आहे. हा उल्कावर्षाव थ्याचर (Thatcher) या धूमकेतूमुळे दिसतो. १८६१ मध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळून गेला होता तेव्हापासून हा उल्कावर्षाव दिसत आहे. पुढे जेव्हा पृथ्वीचा भ्रमणमार्ग जवळून जाईल तेव्हा २० वर्षांनंतर २०४२ मध्ये खूप मोठा उलकावर्षाव दिसणार आहे. हा धूमकेतू पुन्हा २४५ वर्षाने म्हणजे २२७८ सालामध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे. तेव्हा उलकांचा जणू पाऊस पडल्यासारखा दिसेल.

a unique sanyog created on paush Purnima after 144 years
१४४ वर्षानंतर पौष पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा दुर्लभ संयोग, या चार राशींवर पडणार पैशांचा पाऊस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rain in North Konkan Meteorological Department has predicted Mumbai news
उत्तर कोकणात आठवडा अखेरीस पाऊस? जाणून घ्या, हवामान विभागाचा अंदाज काय
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
Astronomy , planets , solar system, Astronomy News,
नभोमंडपात ७ जानेवारीला सात घटनांचा अनोखा संगम
Budh Gochar 2025
Budh Gochar 2025: उद्या होणार २०२५मधील पहिले गोचर; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

हेही वाचा – रानटी हत्तींचा गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा प्रवेश, कुरखेडा तालुक्यात शेतीचे नुकसान

या धूमकेतूचा ( C १८६१/G1) शोध अमेरिकेतील अल्फ्रेंड थ्याचर यांनी ५/४/१८६१ मध्ये लावला. परंतु गेल्या २५०० वर्षांपासून प्राचीन लोकांनी हा उल्कावर्षाव पाहिला आहे. चिनी लोकांनी इ सन पूर्व ६८७ मध्ये हा उल्कावर्षाव पाहिल्याची नोंद आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यूस राज्य शासन जबाबदार – धानोरकर म्हणाले, मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जाणार

निरीक्षण कसे करावे?

उल्कावर्षाव दुर्बिणीतून दिसत नाही, लहान (१०-×५०) आकाराची द्विनेत्री असेल तर चांगले. अंधाऱ्या रात्री जमिनीवर झोपून आकाशात पाहिल्यास अतिशय उत्तम पद्धतीने उल्कावर्षाव निरीक्षण करता येते. सर्व खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमींनी हा उल्कावर्षाव पहावा.

Story img Loader