लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : मुबलक पाणी उपलब्ध पण गावाला वीस- पंचवीस दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने मलकापूर पांग्रा वासीयांचे बेहाल होत आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढला. यामुळे पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली असतानाच गावकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन ५ सदस्यांनी पदाचे राजीनामे दिले.

पिण्याच्या पाण्यासाठी मागील चार महिन्यांपासून गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे .मुबलक पाणी साठा असूनही वीस ते पंचवीस दिवस नळाला पाणी येत नसल्यामुळे , महिलांच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला. महिलांनी घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला . यामध्ये गावातील शंभर ते सव्वाशे महिला हंडे व घागर घेऊन “पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा” अश्या घोषणाबाजी करीत होत्या. हा मोर्चा ग्रामपंचायत वर येऊन धडकला. यावेळी खडाजंगी उडाली. सरपंच व ग्रामसेवक यांनी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र यामुळे गावकऱ्यांचे समाधान झाले नाही.

पाच सदस्यांचे सामूहिक राजीनामे

ग्रामपंचायत सदस्य नात्याने तोंड द्यावे लागत असल्यामुळे सामूहिक राजीनामे देत असल्याचे पाच सदस्यांनी जाहीर केले. ग्राम विकास अधिकारी वसंत चेके यांच्याकडे त्यांनी राजीनामे दिले.यामध्ये गंगुबाई साळवे, समीनाबी निसार पटेल, किरण काकडे, साबिर खा पठाण, संगीता राधाकिसन देशमुख यांचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghagar morcha of malkapur pangravas on gram panchayat resignation of five members due to villagers anger scm 61 mrj
Show comments