लोकसत्ता टीम
अकोला : एका घरात शिरलेल्या घोणस या अत्यंत जहाल विषारी सापाला मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी जीवदान दिले. घोणस साप कुकरच्या शिटीसारखा आवाज काढत असल्याने कुटुंबातील सदस्य भयभीत झाले. त्या सापाला पकडून कुटुंबाला भयमुक्त करण्यात आले.
बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे मोहन पाठक यांच्या घरात विषारी घोणस सापाने प्रवेश केला. गावातील सुनील आगरकर व श्याम वडतकर यानी सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना कळविले.
आणखी वाचा-नागपुरात लवकरच ‘प्रादेशिक नेत्र इन्स्टिट्यूट’, वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती
बाळ काळणे यांनी गायगाव गाठले. घरातील एका कोपऱ्या दडून बसलेला घोणस फुत्कार टाकत असल्याचे काळणे यांना दिसले. घोणस हा अत्यंत रागीट व आक्रमक साप असतो. काळणे यांनी मोठ्या शिताफीने दडून बसलेल्या घोणसला पकडले. घोणसला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.