गोंदिया:- पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. यातंर्गत   दुर्ग-गोंदिया मार्गावरील गोंदिया-गंगाझरी रेल्वे विभागातील गर्डर डी लॉन्चिंग कामासाठी पॉवर ब्लॉक घेऊन हे काम करण्यात येत आहे. दरम्यान दक्षिण-पूर्व मध्य  रेल्वेचे काम अधिक सुरळीत होण्यासाठी आणि नवीन गाड्यांना मार्ग मोकळा करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासा सोबत नवीन प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी वरील काम केले जात आहे. या कामाचा परिणाम म्हणून, शनिवार १८ आणि बुधवार २२ जानेवारी २०२५ रोजी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत या रेल्वे विभागातील त्यांच्या गंतव्यस्थानावरून सुटणाऱ्या गाड्या प्रभावित होतील.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ आणि २२ जानेवारी २०२५ रोजी, गोंदियाहून सुटणारी  क्रमांक ६८७४१ दुर्ग-गोंदिया मेमू, गाडी क्रमांक ६८७४२ गोंदिया-दुर्ग मेमू, गोंदियाहून सुटणारी गाडी क्रमांक ६८७४३ गोंदिया-इतवारी मेमू,  इतवारी-गोंदिया मेमू, तसेच डोंगरगड येथून सुटणारी ६८७११ डोंगरगढ-गोंदिया मेमू, गोंदिया ट्रेन क्र. ६८७१२ गोंदिया-डोंगरगढ मेमू, गोंदिया ट्रेन क्र. ६८७१३ गोंदिया-इतवारी मेमू , इतवारी ट्रेन क्र. ६८७१६ इतवारी वरून निघणारी, इतवारी गोंदिया, गाडी क्रमांक ६८७१६ इतवारी- बालाघाट मेमू आणि बालाघाट येथून सुटणारी ट्रेन क्रमांक ६८७१५ बालाघाट-इतवारी मेमू या गाड्या रद्दच राहतील.

हेही वाचा >>>लैंगिक शोषण: विकृत मानसोपचार तज्ज्ञाच्या विरोधात आणखी एक तक्रार !

याशिवाय १८ जानेवारी २०२५ रोजी ट्रेन क्रमांक १८२४० इतवारी-बिलासपूर शिवनाथ एक्स्प्रेस, १८ जानेवारी रोजी ट्रेन क्रमांक १८११० इतवारी-टाटानगर आणि २१ जानेवारी रोजी १८१०९ टाटानगर-इतवारी आणि १८२३९ बिलासपूर इतवारी-शिवनाथ एक्स्प्रेस या दिवशी या गाड्या सुमारे अर्धा ते एक तास उशिरा  धावणार आहेत.  वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्यिक व्यवस्थापक यांनी दिली आहे.

 गोंदियातून लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी

विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या १६ जानेवारी रोजी  झालेल्या बैठकीत सदस्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावर २४ तास ॲलोपॅथिक डॉक्टर आणि गोंदिया स्थानकात रुग्णवाहिकेची व्यवस्था , गोंदिया रेल्वे स्थानकावरून गोंदिया-रायपूर लोकल आणि दुपारी गोंदिया-नागपूर लोकल पुन्हा सुरू करण्यात यावी तसेच चांदाफोर्ट-गोंदिया सेक्शनवरील गाड्यांचे नियोजित संचालन, आणि गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानक हे एकमेव रेल्वे स्थानक असल्याने, या मार्गावर धावणाऱ्या जास्तीत जास्त गाड्यांना थांबे देण्याच्या सूचना केल्या.बैठकीत मंडळ रेल व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी सर्व सूचनांवर तातडीने कार्यवाही करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे तसेच विकासकामे व प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ विभाग – कमर्शियल मॅनेजर दिलीप सिंग आणि समितीचे सचिव यांनी बैठक आयोजित केल्याबद्दल उपस्थित अधिकारी व सदस्यांचे आभार मानले. बैठकीत समितीचे सदस्य सुदीप जैन, लक्ष्मीचंद रोचवानी, हरीश अग्रवाल, विनोद चांदवानी, रितेश अग्रवाल, अरविंद नांदूरकर, जयप्रकाश तिवारी, अनिलकुमार गट्टानी, चिनू अजमेरा, सौरभ ठाकूर, शंकर सैरानी, ​​राजेश महाजन, भास्कर सिंह आदी उपस्थित होते.