नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरला रविवारी १५ डिसेंबरला होणार हे शुक्रवारीच ठरले. रविवार उजाडला तरी मंत्रिपदाची शपथ कोण घेणार याची यादी काही जाहीर झाली नाही. सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार, माजी मंत्री आणि इच्छुक नागपूरकडे रवाना झाले. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन होते. त्यांनाही मंत्रिपदाबाबत काहीच सूचना नव्हती. उलट त्यांना वगळण्यात येणार याचीच चर्चा अधिक होती. त्यांचे विमान नागपूर विमानतळावर स्थिरावले. ते उतरत असतानाच फोन खणखणला आणि त्यांना गुडन्यूज मिळाली. तो फोन होता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशखर बावनकुळे यांचा आणि निरोप होता शपथविधीला राजभवनावर येण्याचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व राज्याचे लक्ष महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेले. कोण मंत्री होणार, कोण गळणार याकडेच साऱ्यांचे लक्ष. रविवार उजाडला तरी याबाबत कमालीची गोपनीयता महायुतीतील सर्व घटक पक्षांनी पाळली. त्यामुळे उत्सुकता आणखी शिगेला लागलेली. सायंकाळी ४.३० वाजता नागपूरच्या राजभवनात शपथविधी होणार हे निश्चित. तेथे उपस्थित राहण्यासाठी आणि सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी सर्व नवनिर्वाचित आमदार, विधान परिषदेचे सदस्य नागपूरमध्ये शनिवारपासूनच दाखल होऊ लागले होते. पण तेही कोण मंत्री होणार याबाबत अनभिज्ञ होते.

हेही वाचा – आकाश फुंडकरांना आला ‘फोन’! हॅटट्रिकनंतर मिळाला ‘लाल दिवा! संजय कुटे यांना…

रविवारी सकाळी ९ वाजतापासून प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य मत्र्यांना दूरध्वनीव्दारे शपधविधीची कल्पना दिली. फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यावेळी मंत्री होणार नाही अशीच चर्चा होती. त्यांना प्रदेशाध्यक्ष करणार असेही बोलले जात होते. महाजनही रविवारी शपथविधी सोहोळ्याला उपस्थित राहण्यासाठी व सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आले. त्यांचे विमान लॅण्ड झाल्यावर त्यांचा फोन खणखणला. तो फोन होता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा. त्यांनी महाजन यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनावर येण्याचे निमंत्रण दिले. खुद्द महाजन यांनीच नागपूर विमानतळावर ही बातमी माध्यम प्रतिनिधीला दिली.

हेही वाचा – ‘विजेता तू.. देवाभाऊ.. चल पुढे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत

भाजपच्या पहिल्या यादीतच महाजन यांचा समावेश होता. भाजपने अनेक ज्येष्ठ नेत्यांना यावेळी डच्चू दिला. पण महाजन यांना सामावून घेतले. ज्येष्ठ आणि नवीन सदस्य असे मिश्रण भाजपच्या मंत्र्यांच्या यादीत आहे. एक अनुभवी आणि कट्टर फडणवीस समर्थक अशी ओळख मागील दहा वर्षांत महाजन यांनी मिळवली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan minister post winter session nagpur devendra fadnavis cabinet expansion cwb 76 ssb