अमरावती : आईसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला.ही धक्कादायक घटना बुधवार, ३० ऑक्टोबर रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. घटनेनंतर काही तासांतच या प्रकरणातील पाचही आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी अटक करून गजाआड केले.

आरोपींकडून एक चारचाकी व दोन दुचाकी असा ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मनोज राजरत्न डोंगरे (२९) रा. न्यू कॉटन मार्केट मागे, लक्ष्मीनगर, अमरावती, अक्षय धनराज सरदार (२९), अजय अशोक लोखंडे (२८) रा. कपिलवस्तूनगर, अमरावती, मिलिंद अरुणराव डाहाट (२९) रा. भीमनगर, अमरावती व प्रथम गौतम धाडसे (१९) रा. मसानगंज, अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार

हेही वाचा >>>‘‘काँग्रेसच्या षडयंत्रामुळे उमेदवारीपासून वंचित,” माजी आमदाराचा आरोप

पीडित २५ वर्षीय तरुणीचा मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता तिच्या आईसोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात ती घरून निघून गेली. पायदळ शेगाव नाका चौकात पोहोचल्यावर तिने एक दुचाकी थांबविली. त्या दुचाकीवर दोघे बसून होते. तरुणी त्यांच्या दुचाकीवर बसल्यानंतर ते तिला नांदगाव पेठ मार्गाने घेऊन गेले. मार्गावरील एका बारवर थांबून त्या दोघांनी बियरच्या बाटल्या विकत घेतल्या. त्याचवेळी त्या दोघांनी चारचाकी वाहनासह आणखी तिघांना तिथे बोलाविले.

हेही वाचा >>>ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…

तेथून ते पाच जण पीडित तरुणीला चारचाकी वाहनामध्ये बसवून नांदगाव पेठ मार्गाने घेऊन गेले. मार्गात त्या पाचही जणांनी तरुणीवर अत्याचार केला. काही वेळाने पीडित तरुणीला साईनगर परिसरात सोडून आरोपींनी तेथून पळ काढला. सदर घटनेनंतर पीडित तरुणीने गाडगेनगर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. तपासात नांदगाव पेठ मार्गावरील संबंधित बारमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यावेळी एक व्यक्ती ही पीडित तरुणीला हात पकडून घेऊन जात असताना दिसून आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर त्या व्यक्तीचा शोध घेत त्याला अटक केली.

चौकशीत त्याने आपली ओळख मनोज डोंगरे अशी सांगून गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच त्याने आपल्या सहकाऱ्यांची नावेही पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी त्याचे सहकारी अक्षय सरदार, अजय लोखंडे, मिलिंद डाहाट व प्रथम धाडसे यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी व दोन दुचाकी असा ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Story img Loader