लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: ‘माझी मैत्रीण स्वर्गात माझी वाट बघत आहे. ती मला नेहमी बोलावते. स्वप्नात येऊन सोबत नेण्याचा प्रयत्न करते. ती स्वर्गात एकटीच आहे, त्यामुळे तिला साथ देण्यासाठी मला जायचे आहे’ असे वारंवार सांगून २२ वर्षीय युवतीने पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. प्रियंका नंदराव सराटे (रा.संताजीनगर, वाठोडा) असे मृत युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका ही उच्चशिक्षित असून गेल्या वर्षभरापासून ‘चाय-चौपाटी’ येथे नोकरी करीत होती. तिथे कामावर तिची सोनाली नावाच्या मैत्रीणीशी ओळख झाली. काही दिवसांतच दोघींची चांगली मैत्री झाली.

हेही वाचा… “नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे”, डॉ. सुनील देशमुख कडाडले, अमरावतीसह नऊ जिल्ह्यांची घोर उपेक्षा

दोघेही एकमेकींच्या घरी येत-जात होत्या. एकमेकींसाठी नेहमी जेवणाचा डबा आणत होत्या. दोघींची मैत्री खूपच घट्ट होती. सोनालीने गेल्या तीन महिन्यांपूर्वी कोणत्यातरी कारणावरून आत्महत्या केली. सोनालीच्या मृत्यूचा धक्का प्रियंका सहन करु शकली नाही. ती नैराश्यात गेली. तिच्या स्वप्नात सोनाली येत होती.

हेही वाचा… चंद्रपूरमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर

‘ती स्वर्गात येण्यासाठी हट्ट करीत आहे’, अशी माहिती ती आईला सांगत होती. कुटुंबिय तिची समजूत घालत होते. ती कामावर गेल्यानंतरही मैत्रीणीसाठी रडत होती. मैत्रीण स्वर्गात एकटी असल्याचा भास झाल्याने प्रियंकाने घराशेजारी असलेल्या बर्फाच्या कारखान्यातील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी मजूर कामावर कारखान्यात आल्यानंतर त्याला पाण्यात प्रियंकाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl committed suicide by jumping into the water tank in nagpur adk 83 dvr
Show comments