नागपूर : आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. सुरूवातीला आईने दुर्लक्ष केले. मात्र, मुलीची अवस्था बघताच तिला संशय आला. चौकशीअंती बिंग फुटले. मुलीने प्रियकराशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशाल राजूसिंह भूमियार (२०) असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशाल हा डीजे वाजविण्याचे काम करतो. तो गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या आईवडिलांनी त्याला मावशीकडे पाठवले होते. तो नवरात्रोत्सवाच्या गरबामध्ये डीजे वाजवायला गेला असता त्याची ओळख वस्तीत राहणाऱ्या रिया (काल्पनिक नाव) हिच्याशी झाली. . आठवीत असलेली रिया शाळेत जात असताना विशाल तिचा पाठलाग करत असे. विशालने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विशालने तिला १९ नोव्हेंबरला वाढदिवस असल्याचे खाटे सांगून घरी बोलावले. घरी आल्यावर. तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. दबाव टाकला. तिने प्रतिकार केला असता विशालने रियाशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा: पश्चिम विदर्भात काँग्रेसला पुनरुज्‍जीवनाचे वेध

आईला आला संशय
कामावरून घरी आलेल्या आईला मुलगी झोपलेली दिसली. मुलीने पोट दुखत असून डॉक्टरकडे जाण्याची विनंती केली. तिची अवस्था बघून आईला संशय आला. परंतु, मुलगी काहीही सांगायला तयार नव्हती. परंतु, कठोर शब्दांत विचारल्यावर मुलीने प्रियकरासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली. आईला धक्का बसला. तिने थेट कपीलनगर पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रियकर विशाल भूमीयार याला अटक केली.