लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: उकळलेल्या दुधाच्या कढईत पडून गंभीररित्या भाजलेल्या मलकापूरच्या ओमश्री जाधव हिने मृत्यूशी तब्बल तीन आठवडे झुंज दिली. मात्र, ही झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. यामुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मलकापूर येथील हनुमान दूध डेअरीचे संचालक युवराज जाधव नांदुरा रस्त्यावरील जाधववाडीत वास्तव्यास आहेत. घराच्या आवारात त्यांनी व्यवसाय थाटला आहे. मागील २७ एप्रिलला त्यांनी नेहमीप्रमाणे मोठ्या भांड्यात दूध उकळून मोठ्या कढईत ठेवले होते. सहा वर्षीय कन्या ओमश्री ही इतर चिमुकल्यांसमवेत खेळताना अनावधानाने त्या दुधाच्या कढईत पडली. घरच्यांनी तिला बाहेर काढून उपचारासाठी स्थानीय रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी ओमश्रीला प्रथम जळगाव खान्देश येथे व नंतर मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्या ठिकाणी ओमश्रीवर उपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

हेही वाचा… सर्वत्र ‘मविआ’ जिंकत असताना ‘इथे’ मात्र भाजपला एक हाती सत्ता….

गंभीर जखमी ओमश्रीची साक्षात मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, तीन आठवड्यानंतर ही झुंज संपली. नजीकच्या वाघुड येथील जाधव फार्मवर ओमश्रीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl died after falling into pan of boiling milk in malkapur buldhana scm 61 dvr