वर्धा : हिंगणघाट येथील अंकिता प्रकरणाची धक्कादायक पुनरावृत्ती झाली आहे. सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथील अंकिता सतीश बाईलबोडे या तेवीस वर्षीय तरुणीची धारधार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीची ही घटना आहे. हल्ला झाल्यानंतर तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अखेर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून गावकरी संतप्त झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्राप्त माहितीनुसार, रात्री नालवडी येथील दोन युवक दोन मुलींसह दहेगाव येथे पोहचले. सोबत असलेल्या मुलींनी अंकितास आवाज देत घराबाहेर बोलावले. ती बाहेर येताच तिच्या मानेवर भोसकण्यात आले. हे करीत चौघेही पळ काढू लागले. मात्र गावकऱ्यांनी त्यांना पाठलाग करीत पकडले. त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी मुख्य आरोपी लक्की अनिल जगतापवर गुन्हा दखल केला. पण तो फरार आहे. त्याचे अंकितावर एकतर्फी प्रेम असल्याची चर्चा होती. तो तिला नेहमी त्रास द्यायचा. अंकिताने ही बाब घरी सांगितली होती. मात्र त्यामुळे राग ठेवून आरोपी लक्की हा अंकिता व तिच्या भावास जिवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती पुढे आली आहे. अंकिता ही वर्धेत पदव्युत्तर शिक्षण घेत होती.