नागपूर : एक तरुण अनेक दिवसांपासून परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवत होता. अश्लील चित्रफीत फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन दबाव टाकत होता. मुलीने विरोध केला असता त्याने तिच्या वडिलांना अश्लील चित्रफीत पाठविली. हा प्रकार शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत समोर आला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. प्रज्योत हरिहर बंडोले (२०) रा. शांतीनगर, असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

पीडित मुलगी अकरावीची विद्यार्थिनी आहे. आरोपी प्रज्योत हा चिमूरच्या एका महाविद्यालयात बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. एकाच वस्तीत रहात असल्याने दोघांची ओळख होती. या दरम्यान प्रज्योतने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी प्रज्योतचे मुलीशी भांडण झाले. त्यानंतरही प्रज्योत तिला त्रास देत होता. त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीतर तिचे नग्न छायाचित्र आणि चित्रफीत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी देत होता. तरीही मुलीने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला. यामुळे चिडून त्याने मुलीच्या वडिलांना अश्लील चित्रफीत पाठवली.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

हेही वाचा – ‘मेरे घर के ऊपर से वायर… ‘, ही कसली जनहित याचिका, उच्च न्यायालय म्हणाले…

हेही वाचा – प्रा. साईबाबा यांच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुलीची विचारपूस केली असता सर्व प्रकार पुढे आला. प्रज्योत विरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि आयटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून प्रज्योतला अटक केली.