नागपूर : ग्रामीण भागातून नागपुरात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आलेल्या मुलीकरिता कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगा बघताच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी (१९, कन्नड-कामठी) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही अभ्यासात हुशार होती. तिला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी तिने नागपुरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वानाडोंगरीमध्ये मैत्रिणीसोबत भाड्याने राहत होती. तिच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने कुटुंबीयांनी तिचे लग्न करण्याचा विचार केला. तिला बघायला मुलगा येणार होता. आईवडिलांनी तिला याबाबत माहिती दिली. मात्र, वैष्णवीला लग्नाऐवजी शिक्षण घ्यायचे होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ती तणावात होती. तिने आईवडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिक्षणासाठी आर्थिक अडचण असल्याने त्यांनी मुलीचे लग्न उरकण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे तणावात असलेल्या वैष्णवीने सोमवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पालकांनी लग्न ठरवताच मुलीने घेतला गळफास!; घरच्या गरिबीने आई-वडील होते हतबल
ग्रामीण भागातून नागपुरात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आलेल्या मुलीकरिता कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगा बघताच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
First published on: 07-09-2022 at 14:53 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl parents decided marry parents desperate poverty suicide ysh