नागपूर : ग्रामीण भागातून नागपुरात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आलेल्या मुलीकरिता कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगा बघताच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी (१९, कन्नड-कामठी) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही अभ्यासात हुशार होती. तिला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी तिने नागपुरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वानाडोंगरीमध्ये मैत्रिणीसोबत भाड्याने राहत होती. तिच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने कुटुंबीयांनी तिचे लग्न करण्याचा विचार केला. तिला बघायला मुलगा येणार होता. आईवडिलांनी तिला याबाबत माहिती दिली. मात्र, वैष्णवीला लग्नाऐवजी शिक्षण घ्यायचे होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ती तणावात होती. तिने आईवडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिक्षणासाठी आर्थिक अडचण असल्याने त्यांनी मुलीचे लग्न उरकण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे तणावात असलेल्या वैष्णवीने सोमवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा