वाशीम : शहरात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून एका सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती महादेव बनसोडे, असे मृत मुलीचे नाव असून ती आपल्या भावासह शहरातील पुसद-वाशीम मार्गावरील उड्डाणपुलाजवळून सायकलने जात असताना अचानक वीज कोसळली.

यात ज्योतीचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ जखमी झाला आहे. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या मृत्यूमुळे बनसोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Story img Loader